स्वप्नील वानरे प्रतिनिधी पथ्रोट
एकीकडे सरकार स्वच्छ भारत स्वच्छ अभियान राबवत असून गेली अनेक वर्ष उलटूनही पथ्रोट येथे मुत्रीघर नाही. तेथील नागरिक दुकानदार मैदानात खेळणारी मुले महिला त्रस्त झाले आहे. चौकातील घराच्या दुकानाच्या सोसायटीच्या ग्रामपंचायतच्या भिंतींना मुत्रीघराचे स्वरूप आले आहे.
स्थानिक स्त्रियांना याचा त्रास होत आहे. या सर्व कडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. वर्दळीच्या ठिक ठिकाणी मुत्रीघर देण्यात यावे.अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
