अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाट
संपुर्ण जिल्ह्यात बुधवार रात्री तीन तास पाऊसधारांच्या तांडवाने हाहाःकार उडाला असुन एकुणच परिस्थिती बघितल्यावर काळीज धक्क होते. नशिब बलवत्तर असल्याने कोठेही मनुष्य प्राणहानी झाली नाही.मात्र आज ही नदीकाठची अनेक गावे जलमय आहेत. पुन्हा पुराचा धोका कायम असल्याने शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. पठार नदीच्या पुरामध्ये एक व्यक्ती वाहुन गेला असुन उगवा गावाच्या शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन लोकांना एसडीआरएफ पथकाकडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २ हजार २३७ घरांचे नुकसान झाले असून ६ हजार २६३ हेक्टर पिकांचे नुकसान तर १५३ जनावरांचे मृत्यू झाले आहे. अकोट तालुक्यातील पनोरी येथील वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच दि.22/07/2021रोजी आलेल्या पुरा मुळे डाबकी गावातील लोकांच्या घरामध्ये घुसलेल्या पाण्यामुळे लोकांची तारांबल उडाली अशि बिटक परिस्थिति असतांना सुध्दा आज 2 दिवस झाले तरी सुध्दा हे बेजबाबदार शासन आता पर्यंत नोंद सुद्धा घेतली नाही,पोटांची भुक भागण्याची सोय नसता ह्या लोकांची कुणाकडे भगावे माझी गावकरृयाणा वतिन विनंती करतो यांची लवकरात लवकरच दखल घेण्यात यावी, याकरिता डाबकी गावी आलेल्या पुर ग्रस्ताना अन्न वाटप करून श्रि.सुहास बळीराम मोरे (RFO) तरी ही तीन दिवसा पासुन मित्र परिवार आमच्या वतिने गावातील लोकांना जेवनाची मदत करत आहोत.आज आमच्या गावातील श्रि.सुहास बळीराम मोरे (RFO) यांनी आज जे मदत केली आम्ही त्यांचे आभार मानतो सर्व मित्र परिवारांच्या तर्फे आभार मानतो
