स्वप्निल वानरे तालुका प्रतिनिधी
उज्जैन वरून परत येत असताना पहाटे 5:30 ते 06:00 च्या दरम्यान भीषण अपघात. मिळालेल्या माहिती नुसार 2 जणांचा मृत्यू आणि 8 जण गंभीर. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी क्रुझर चारचाकी वाहनाने गेले होते. परत येत असताना परतवाडा - अकोला राज्य महामार्गा वर पथ्रोट पोलिस स्टेशन हद्दीतल्या कालव्या वरील पुलाच्या संरक्षण भिंती ला एम. एच.13 सी.एस. 8570 क्रमांकाचे वाहनांची धडक
माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू कले. रुग्णवाहीका बोलावून जखमींना उपचारासाठी अचलपूर उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरील संरक्षण भिंती ला क्रुझर धडकली. पथ्रोट पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व त्यांची टीम त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून जखमींना उपचारासाठी अचलपूर उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अंजनगाव सूर्जी येथील रहिवासी श्री राजु कातोरे ,श्री मंगेश दातीर, हर्षवर्धन आडगोकर, श्री अभिजीत भावे,श्री मंगेश नाथे, श्री अमोल पायघन, श्री अनुप रेखाते,श्री आश्विन अतकरे,श्री रंजीत आवारे व श्री सागर दातीर.
