देवानंद नेमाने प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विचारांना सुवर्ण विचार_ _संबोधित करणारी शिवकन्या कादंबरी धमाळ हिच्या हस्ते नांदुरा येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करून सामूहिक शिवआरतीचा कार्यक्रम जीतू मोरे तसेच त्यांचे सहकारी मंडळी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला .
छत्रपती शिवराय जिच्या हृदयात वास करतात अशी ही अवघ्या सहा वर्षांची चिमुकली शिवकन्या कादंबरी धमाळ. मूर्ती लहान पण कीर्ती महान ह्या म्हणीप्रमाणे तिचे व्यक्तिमत्व.आज शिवरायांचा दुग्धाभिषेक करून शिवआरती करण्यात आली त्याचबरोबर शिवप्रेमिंना भेट देऊन शिवकन्या कादंबरीने छत्रपती शिवारायांचे विचार सर्वांसमोर व्यक्त केले. तसेच सर्व मुलींना आव्हान केले कि "आपल्यातच जिजाऊ माँसाहेब आहेत त्याप्रमाणेच आपण आपल्यातील शक्ती ओळखावी, व त्याचप्रमाणे कुठलेली कृत्य न डगमगता करावे". शिवकन्या कादंबरीच्या प्रमुख उपस्थिती बरोबरच तिचे वडील तसेच सहकारी वर्गाची सुद्धा विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
या कार्यक्रमाला हिंदवी प्रकाश बावस्कार, लताताई ठोंबरे ,वैशालीताई आडोळकर,शुभराज डंबेलकर, वैभव निवणे, आकाश घट्टे, आकाश भिवटे, पवन वर्मा, वैभव कापडे, मंगेश इटखेडे, प्रशांत सांभारे, आकाश वकटे, धनंजय वतपाळ, प्रकाश बावस्कार, आडोळकर काका,खुशाल राठी,सुमित नाफडे,विशाल बग्गन,अक्षय डंबेलकर,अजय बेलोकार,ललित मलिक,धीरज इटणारे,आकाश म्हसने,महेश उंबरकर राहुल एकडे, विशाल राखोंडे, प्रसाद नेमाडे, अजिंक्य खंडारे व सर्व शिवभक्त उपस्थित होते.
____
