पथ्रोट प्रतिनिधी स्वप्नील वनारे
मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान याला सुरुवात केली.मात्र पथ्रोट ग्रामपंचायत प्रशसनाने याकडे दुरलक्ष केले आहे. पथ्रोट परिसरात जागो जागी घाणीचे वातावरण एकीकडे भारत सरकार स्वच्छ भारत अभियान राबत आहे. पण पथ्रोट ग्रामपंचायत प्रशसनाने त्याकडे दुरलक्ष केलं आहे. परिसरात मुख्य रस्त्यावर नालीचे उपसण्याचे ढिंगारे आहेत. मुख्य रस्त्याचे ढिगारे तसे पडुन आहेत.
गावात ऐकुन 6 वार्ड आहे.प्रत्येक वार्डात घाणीचे वातावरण आहे. कुठेही कचरा कुंडीची कुठलीही व्यवस्था नाही. व त्या कचऱ्याची कुठेलेही नियोजन नाही आहे. या पासुन गावकरी त्रस्त झाले आहेत. व गावात कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी गावकरी मंडळी करत आहे.

