Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मौजे बोरगाव येथील उत्तरेकडील शेतकरीवर्ग पानदान रस्त्यामुळे अतिशय त्रस्त

Responsive Ad Here

 दत्तात्रेय शेळके बोरगाव प्रतिनिधी

            बोरगाव येथील उत्तरेकडील शेतकरीवर्ग पानदान रस्त्यामुळे अति शेत्र असतो जालना प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेचार ते पाच हजार लोकसंख्या असलेले बोरगाव हे खेडेगाव येथील शेती शिवार हे जवळ जवळ चारी बाजूंनी चार ते पाच किलोमीटर आहे उत्तरेकडील शिवारे शेवली कोळवाडी दरेगाव या गावांना जाऊन भिडलेले आहे या भागातील शेतकऱ्यांना जाण्यासाठी एकच पांदन रस्ता आहे तो फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच मोकळा असतो.

    म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व कामे आटोपल्या नंतरच परंतु पावसाळ्यामध्ये या रस्त्यामध्ये एवढा चिखल असतो की एक पाय टाकायचा आणि दुसरा काढायचा कशीबशी पेरणी केलेला शेतकरी संपूर्ण पावसाळा भर अतिशय त्रस्त असतो शेतात खत द्यायचे किंवा फवारणी करायची असेल तर तिसरा तीन ते चार किलोमीटर डोक्यावर घेऊनच करावी लागते थोडक्यात स्वतः नजरेने पाहणाऱ्या लाच या शेतकऱ्यांचे हाल माहित असतात हे चालायचे तरी किती दिवस म्हणून संबंधितांनी या पांदण रस्त्याची पाहणी करून या होणाऱ्या त्रासापासून शेतकऱ्यांना सोडवावे अशी मागणी उत्तरेकडील शेतकरी वर्गाकडून होत आहे