Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मेहकर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

Responsive Ad Here

   मो.असलम परवेज : तालुका प्रतिनिधी 


डॉक्टर होऊन गोरगरीब लोकांची सेवा करणार - कु. सादिया सदफ शेख इसहाक

   मेहकर येथे यावर्षी इयत्ता दहावी व बारावी मध्ये गुणवंतांच्या यादीत झळकलेल्या नगर परिषद मेहकर येथील उर्दू प्रायमरी  शिक्षकांच्या पाल्यांचा सत्कार घरोघरी जाऊन शिक्षक परिवाराच्या वतीने करण्यात आला. पुष्पगुच्छ व पेढे देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करून  शुभेच्छा देण्यात आले. कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे विद्यार्थी खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे आवाहन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना रागिब सर यांनी केले.

    वर्ग दहावी मधून शकूर सर यांची मुलगी कुमारी शिफा नाज मोहम्मद शकुर ९८.२०% वर्ग बारावी मधून इसहाक सर यांची मुलगी कुमारी सादिया सदफ शेख इसहाक ९२.००% गुण .मुस्तफा शहा सर यांची मुलगी कुमारी नबीला आयमन मुस्तफा शहा ९०.३३% गुण तर गुलाम सादिक सर यांची मुलगी कुमारी सीफगत आस्मा गुलाम सादिक ८९% गुण घेऊन उत्तीर्ण होऊन गुणवंता च्या यादीत झळकल्या सत्कार सोहळ्यात कुमारी सादिया सदफ म्हणाली की, नीट ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होईन व गोरगरीब व अशिक्षित लोकांची सेवा करेन.

         या वेळी दिलीप देबाजे सर रागीब सर ,गीरे सर,शकूर सर, सरदार सर, गुलाम सादिक सर, यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साबळे सर, दांदडे सर ,वकार सर, सलीम सर ,मुस्तफा शहा सर, यांनी परिश्रम घेतले.