Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ओबीसी जनगणनेसाठी सर्वपक्षीय बैठक

Responsive Ad Here

अंबड ता प्रतिनिधी भिमराव हा रे


ओबीसी जनगणनेसाठी राज्य सरकारने तत्कालीन व आताच्या सरकारने आठ वेळा प्रस्ताव सादर केला., मात्र केंद्राने हे आठ ही प्रस्ताव नाकारल्याने आत्ता हाच प्रस्ताव राज्य सरकार कडून मंजूर करून चाळीस हजार राजकीय आरक्षित जागा ह्या ओबीसी साठीच राखीव ठेवणार असल्याचे स्पष्ट मत मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अंबड तालुक्यातील दोदडगाव अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील मंडल स्मारकावर मंडल आयोग लागु दिनानिमित्त शनिवारी (७) रोजी अभिवादन व सामाजिक न्याय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे, आमदार महादेव जानकर, माजी मंत्री बबनराव ढाकणे  माजी आमदार नारायण मुंडे, आमदार राजेश राठोड, सशिला मोराळे, माजी आमदार रामराम वडकुते, अरुण खरमाटे, बाबुराव सतकार, नारायण चाळगे, प्रा.सत्संग मुंडे, दिपक बोराडे, आदीची प्रमुख उपस्थिती होती.

                  पुढे बोलताना  विजय वडेट्टीवार म्हणाले सत्ता ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही,केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की राज्य सरकार बनवण्यासाठी आम्ही वेटिंग वर आहोत.त्यास प्रतिउत्तर देताना म्हणाले की आम्ही काय ऑक्सिजन वर आहोत काय असा टोला नारायण राणे यांना लगावला. मंत्रीपद आज आहे तर उदया नाही सत्ता बांधलकी नसल्याचे यावेळी सांगितले.

     पूढे वडेट्टीवार म्हणाले माजी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर समजले कि त्यांच्यावर होणारा अन्याय त्याच्या डोळ्यातील अश्रूतून दिसत असून हा ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होवुन ओबीसी च्या दोन भावात दोन जातीत जातीयवादी भांडणे लावल्या जात असून.आता आम्ही एकोप्याने लढुन सत्यनारायण महापुजा ही आम्हीच करणार व खारीक खोबरे ही आमची लेकरे खाणार असल्याचे सांगितले.

आता शिवसेना सत्तेत आली तर मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा नाही आणि भाजपा व काँग्रेस पक्ष सत्तेत आले तरी ओबीसी चा मुख्यमंत्री होत नसल्याने परखड मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ओबीसी च्या यूपीएससीच्या एक हजार पात्र मुलांची परिक्षा घेण्याचे आज  आयुक्तांना सूचना देण्यात येवून ही परीक्षा तातडीने घेतल्या जाणार असल्याचे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी, डाँ. प्रकाश इंगळे, मारोती राऊत, संतोष जमधरे, मोरीत अन्सारी अन्सारी, सुरेश गवळी, नवनाथ वाघमारे,  भागवत राख, संतोष साबळे, ज्ञानेश्वर वाघ, सुबोध मुंडे, अनिकेत मुंडे, लहु दरगुडे, आदींची यावेळी उपास्थिती होती.