देवानंद नेमाने प्रतिनिधी
शेलोडी नगरीमध्ये यावर्षी सुद्धा भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. देशासाठी आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे खर्ची घातलेल्या माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना काहीतरी भेट दिल्याचा आनंद शेलोडीवासीयांच्या डोळ्यात दिसत होता. व माजी सैनिकांना कृतकृत्य झाल्याची भावना दाटून आली होती.
सर्वप्रथम ग्रामपंचायत शेलोडी चे सरपंच श्री.समाधान रिठे व पदाधिकारी यांनी त्यांचा ध्वजरोहणाचा मान सियाचीन भागात सेवा देऊन नुकतेच निवृत्त झालेले भारतीय जवान श्री . निवृत्ती अरुण बळप यांना दिला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर बळप यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीने श्री विनोद नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेऊन निवृत्त हवालदार श्री विश्वनाथ जायगुडे यांच्या हस्ते शाळेत ध्वजरोहण केले. व सालाबादप्रमाणे गावकाऱ्यांनी सैनिकांच्या आदरास्तव बनवलेल्या सैनिक स्तंभाजवळ निवृत्त सैनिक श्री.त्र्यंबक गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेलोडी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून उदयाला येत आहे. या गावाने जवळपास 25 पेक्षा जास्त जवान या देशाला दिले आहेत. या कार्यक्रमाला सध्या कार्यरत असणारे व सुट्टीवर आलेले जवान श्री योगेश रामधन शेवाळे , श्री राम सुभाष हलकरे माजी सैनिक राजू पवार,राजेंद्र नेमाने,बापू सकुंडे, ज्ञानदेव कळस्कर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील
सेवानिवृत्त सैनिक विशाल कापसे,शिवाजी खोडके. रामदास शेडगे, हे सुद्धा वेळात वेळ काढून या अनोख्या कार्यक्रमाला उपस्थित होते. गावातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. सैनिक स्तंभाजवळ होणाऱ्या ध्वजारोहनासाठी व नेहमी प्रमाणे युवा संघाने विशेष मेहनत घेतली यासाठी शेलोडी ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन !!

