Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संपादक डॉ. माधव हिवाळे यांना जीवे मारण्याची धमकी येणाऱ्या वर कारवाई करा - पत्रकार संघटनेची मागणी

Responsive Ad Here

शेख सज्जात शेख प्रतिनिधी

मलकापूर 17/8/21 येथे वाशिम येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक भारत संग्राम चे मुख्य संपादक  डॉ. माधव हिवाळे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी वर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की संपादक डॉ. माधव हिवाळे यांना आठ ऑगस्ट रोजी ग्राम पांचबा येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी चा संबंध जोडून दिनांक 11 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध बातमीसाठी आरोपीची बाजू घेऊन आपण बातमी का छापली म्हणून धमकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करा व चौथ्या आधारस्तंभला आश्वासित करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      निवेदन देतेवेळी राष्ट्रीय विश्वागामी पत्रकार संघटनेचे विदर्भ प्रदेश सचिव उल्हास शेगोकार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश दांडगे ,जिल्हा सचिव श्रीकृष्ण भगत, जिल्हा कार्याध्यक्ष एन .के. हिवराळे,करणसिंग शिरसवाल जिल्हा संघटक ,धनश्रीताई काटीकर संपादिका दैनिक अहिल्याराज, गजानन ठोसर जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ, समद कुरेशी जिल्हा उपाध्यक्ष, अजय टप जिल्हा उपाध्यक्ष, दीपक ईटणारे तालुका प्रसिद्धीप्रमुख, अनिल गोटि जिल्हा सदस्य, श्रीकृष्ण तायडे,मंगेश सातव, एडवोकेट मो वसीम, हनुमान भगत आधी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.