तालुका प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे देऊळगाव राजा
अनेक वर्षापासून बंद पडलेला दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यासह नुकतीस
कारखान्याची 16 ऑगस्टला पाहणी केली. डॉ. राजेश टोपे हे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून त्यांनी समर्थ च्या तांत्रिक कर्मचाऱ्याला घेऊन भेट दिली. कारखान्याची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.असेही ते म्हणाले हा कारखाना भाडेतत्त्वावर किंवा थेट विकत घेऊन सुरू करण्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे.
पन्नास वर्ष जुना हा कारखाना 1972 मध्ये आप्पासाहेब देशमुख यांनी सुरू केला होता. दोनिक वर्ष कारखाना सुरू राहिल्यानंतर अकरा वर्षे हा कारखाना केंद्र सरकारच्या नियुक्त केलेल्या प्रशासक यांच्या ताब्यात होता. 1998 मध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे चेरमन झाल्यानंतर 2011 पर्यंत यशस्वीरित्या चालवला त्यामुळे पालकमंत्री पुन्हा एकदा कारखाना सुरू करण्याचा विचार आहेत. कारखान्याकडे सध्या 25 कोटी रुपयांची थकबाकी आहे बाराशे टन उसाचे गाळप हा कारखाना करू शकतो.
