Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जलंब येथील तीनही ग्रामसंघांची मा.प्रधानमंत्री यांच्या "आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद " कार्यक्रमात उपस्थिती

Responsive Ad Here

शेगांव प्रतिनिधी 

जलंब येथे आत्मनिर्भर नारीशक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तीनही ग्रामसंघाच्या पदाधिकारी ,बचत गटाच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.मा.प्रधानमंत्री यांनी "आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद" व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महिलांशी संवाद साधला.

जलंब येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली.तीनही ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिप प्रज्वलन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मा.पंतप्रधान यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे साधलेला संवाद प्रोजेक्टर च्या माध्यमातून उपस्थित महिलांसमोर प्रक्षेपित करण्यात आला.

  तीनही ग्रामसंघाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून करण्यात आली.तसेच अल्पोपहाराचे व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमास प्रवाह महिला सामसंघाचे तीनही पदाधिकारी अध्यक्ष - कौशल्या गजानन घोपे,सचिव- उज्वला राजेश गवात्रे,कोषाध्यक्ष संगीता सुनिल सोनटक्के, लिपीका - जया रामेश्वर जामोद केडर (CRP ) मालूताई गुणवंतराव देशमुख व सदस्या उपस्थित होत्या. 

  आधार महिला ग्रामसंघाचे तीनही  पदाधिकारी अध्यक्ष - निला रामदास बाठे, सचिव दिपमाला बालकृष्ण हलोडे,कोषाध्यक्ष - शारदा गजानन देशमुख, लिपीला सविता राजू देशमुख केडर (CRP ) विजया दिपक चोपडे व सर्व सदस्या उपस्थित होत्या .

सूर्योदय महिला ग्रामसंघाच्या तीनही पदाधिकारी अध्यक्ष सिमा विठ्ठल शेगोकार, सचिव गायत्री सचिन असंबे कोषाध्यक्ष मिरा श्रीकृष्ण मोहे व सर्व सदस्या उपस्थित होत्या . तसेच अनिल पुरुषोत्तम आवारकर - बँक सखी मिनाताई धामनकार- MIP, CRP . ग्रामपंचायत ऑपरेटर सचिन सोनटक्के सहकारी गणेश लाधे उपस्थित होते . तसेच विशेष मोलाचे सहकार्य  चैतन्य कोचिंग क्लासेस चे संचालक अभिषेक जामोदे  व शुभम भांबेरे यांनी केले .