Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कही मधुकर मुंडे यांचे नाव द्या प्रहारचे मागणी

Responsive Ad Here

संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगावराजा

        अहमदपूर  तालुक्यातील किनगाव प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने मा ना श्री राहुलजी केंद्रे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातुर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि प लातुर यांना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कै मधुकर गंगाराम मुंढे साहेब यांचे नाव देण्यात यावे, मंजुरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत सर्व ग्रामपंचायत ठराव, पंचायत समिती अहमदपूर बैठकीत घेण्यात आलेला ठराव,जि प सदस्य अशोक काका केंद्रे यांचे पत्र जोडुन, आज जि प लातुर येथे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. 

      कै मधुकर दादा यांनी किनगाव सरपंच पदावर असताना आनेक गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे अपंगांचे कैवारी होते .त्यांनी आपल्या स्वताच्या मालकीची जमीन किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,बस स्टँड, पशुवैद्यकीय दवाखाना,जि प शाळा, आपल्या जमीनी शासनाला दान केल्या त्याचे कार्याने त्यांनी किनगाव चे नाव महाराष्ट्र भर गाजविले. आजही त्यांचे नाव  किनगाव येथील जनतेच्या तोंडात आहे  त्यांनी शिवसेनेत राहुन सरपंच पदापासून ते जिल्हा अध्यक्ष  पर्यंत जाऊन सामाजिक कार्य केले.सरपंच पदावर असताना त्यांनी गावांमध्ये रस्ते ,शाळा, दवाखाना,दलीत वस्ती,पाणी अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

   त्यांनी किनगाव मध्ये एक स्वतंत्र वस्ती बांधुन त्या वस्तीला कै केशव सितारामजी ठाकरे नगर असे नाव देण्यात आले गरिब जनतेला राहण्यासाठी आसरा दिला.मा साहेबांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव  कर्मयोगी कै मधुकर दादा गंगारामजी मुंढे असे नाव देण्यात यावे अशी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव व समस्त गावकरी यांच्या उपस्थित,शहर अध्यक्ष बाळू आमले,शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले,सोशलमीडिया प्रमुख रामेश्वर चिकलबिडे,दिनेश किनकर,महेश चाकाटे, वैजनाथ सुनेवाड,ॲड अक्षय क्षिरसागर, गोविंद आंधळे, बबलु कुरेशी, नितीन मुंढे, विशाल चावरे,कलीम शेख,इम्रान पठाण, गणेश श्रृंगारे, बालाजी पांचाळ,गणेश बोडके,गडकरी हनुमंत,सोमनाथ स्वामी, भंडारे भिमा, पांचाळ सतिश,सतिश ठाकुर,शेळके ओम,सावता श्रृंगारे, सिध्देश्वर सुरेश, हुडगे रुतिक, यवंदगे देविदास,मिटकरी,अनवर तांबोळी, श्रीनिवास,जाफर शेख,नजीर शेख,मिटकरी अभिषेक, वाघमारे अशोक, मुकुंद आदुडे आदिजण प्रहार पदाधिकारी उपस्थित होते समस्त गावकरी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला.