राजकुमार डोके जालना प्रतिनिधी
महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागांमध्ये कामगार नोंदणी एजंटचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे हे एजंट लोक हजार दोन हजार रुपये घेऊन कामगारांची नोंदणी करत आहेत मग तो कामगार असो किंवा नसो त्यांना या बाबी शी काही घेणेदेणे नाही परंतु यामध्ये गरीब कामगार ज्यांनी सहा सहा महिन्यापासून फॉर्म ऑनलाईन नोंदी केलेल्या आहेत त्यांची रजिस्ट्रेशन होत नाही यस येथील अधिकारी तसेच कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करणारे अधिकारी कारणीभूत आहेत स्कॉलरशिप फॉर्म दाखल करून एक एक वर्ष पूर्ण झालेले आहेत.
त्यांना स्कॉलरशिप चा लाभ मिळत नाही तसेच ते लोक इतर लाभापासून वंचित आहेत पाच हजार रुपयाचे फॉर्म भरून कामगारांनी वर्ष उलटून गेले आहे तरी त्यांच्या नावावर पैसे पडत नाहीत गोरगरीब लोक ऑफिस मध्ये चक्र मारून परेशान आहेत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता ही लोकं उडवाउडवीची उत्तरे देतात याला जिम्मेदार कोण आहे असा प्रश्न करीत कामगारांमध्ये चर्चेस दिसून येत आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बांधकाम आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत तेव्हा खर या कामगारांना न्याय मिळेल.