Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अण्णाभाऊ साठे जयंतीदिन अर्थात मराठी भाषादिन

Responsive Ad Here

शेख सज्जात शेखर आमचे प्रतिनिधी

       आज अण्णाभाऊ यांची जयंती, त्या निमित्ताने त्यांना शब्द रूपी अभिवादन. अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील असे एक साहित्यिक आहेत, की ज्यांचा पुतळा विदेशातही उभारल्या गेला. ज्यानी कथा, लघुकथा, वगनाटय, लावणी, चित्रपट, कथा असे सहित्याचे जवळपास सर्वच प्रकार प्रभाविपणे हताळले. *फकीरा* कादंबरी असो की माझी मैना गावाकड राहिली* ही लावणी असो, त्यांचे साहित्य अजरामर झाले. अण्णाभाऊ चे साहित्य अजरामर हे दैवी चमत्कारमुळे नव्हे तर ते एका वैचारिक बैठकीतील लिखाणामुळेअजरामर झाले.

                                  अण्णाभाऊ चे साहित्य

   फक्त दीड दिवस शाळेत जाणाऱ्या अण्णा ने 1949 मध्ये पहिली कथा लिहून साहित्य कला कृती ला प्रारंभ करुन 1969 पर्यंत न थकता लिहित राहिले. अण्णा ने त्यांच्या संघर्षमय 50 वर्षाच्या जीवनात नव्वद पुस्तके लिहिलित; त्यात 14 लोकनाट्य, 15 पोवाडे, 13 गीत पुस्तके, 1नाटक, 1 प्रवास वर्णन, 13 कथा संग्रह, 7 चित्रपटकथा, आणि 32 कादंबऱ्या लिहिल्याचे. त्यांचे विविध साहित्य 27 भाषेत अनुवादित झालेत. अनेक कथा कादंबऱ्या वर मराठी व हिंदी भाषेतून चित्रपट निर्मिती झाली. अभंग गाथेच्या  मध्येमातून लोकांना दिशा देणारा मध्येयुगातील संत तुकाराम महाराज आणि आधुनिक युगतिल आपल्या शब्दाने लोकांना क्रांति करण्याची प्रेरणा देणारा तुकाराम म्हणजेच अण्णा भाऊ असे साहित्यिक पुन्हा या महाराष्ट्राला आणि देशाला लाभने कठिण.  अशा अण्णाभाऊचे साहित्यामुळे मराठी साहित्याला सौंदर्य प्राप्त झाले आणि मराठी भाषा ही जिवंत राहिली. म्हणून अण्णाभाऊ साठेचा 1 ऑगस्ट हा जन्म दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करुन त्यांना अभिवादन करू या शासनाला अण्णाभाऊ साठे यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून साजरी करण्याची सुबुद्धी सुचो