Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्यांचा पिक विमा समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्र्यांनी केले बैठकीचे आयोजन आमदार राजेश एकडे

Responsive Ad Here

 देवानंद नेमाने प्रतिनिधी

   मुंबई :- सन २०२० मध्ये मलकापूर व नांदुरा तालुकासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे.परंतु अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही.शेती करीत असताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तडजोडी कराव्या लागतात.मागील एक ते दीड वर्षापासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेले लॉकडाऊन,कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे व पिक विमा मंजूर झाला नसल्याने शेतकरी बांधवांनासमोर गंभीर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.

    .या पूर्वी दिनांक १७ मे जुन २०२१ रोजी सदर बाबत राज्याचे कृषिमंत्री मा.दादाजी भुसे यांना ईमेल द्वारे निवेदन पाठऊन उपरोक्त मागणी केली होती व आज दि.25/08/2021 रोजी पुन्हा मुंबई येथे मा.कृषी मंत्री महोदयांनी बुलढाणा जिल्हा पीक विमा खरीप 2020 नुकसान भरपाई बाबत बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये *आ.राजेश एकडे* यांनी उपस्थित राहून मलकापूर व नांदुरा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ अदा करावा.

   अशी निवेदनाद्वारे मागणी केली.माननीय कृषीमंत्री महोदयांनी सदर बाबत सकारात्मकता दर्शवित तात्काळ मा.सचिव कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांना मलकापूर व नांदुरा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर करणे बाबत त्वरित कार्यवाही करावी अश्या सूचना केल्या,आ.राजेश एकडे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्या मुळे मलकापूर व नांदुरा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पिक विमा मिळण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे.यावेळी मलकापूर नगरीचे नगराध्यक्ष श्री.हरीशभाऊ रावळ, मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी,नगरसेवक श्री.राजेंद्र वाडेकर,श्री.राजेंद्र वासुदेव पाटील हे प्रामुख्याने उपस्थीत होते.