हिवरखेड:जितेश कारीया
तेल्हारा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य तेल्हारा तालुका कार्यकारिणी नुसतीच जाहीर झाली.या समूहाचा उद्देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार व सर्व धर्म समभाव म्हणजे मानवतेच्या उत्थानासाठी महाराजांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवून तरुणांची एक फळी निर्माण करणे व होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा बिमोड करणे हा आहे,कारण तरुण हा देशाचा कणा आहे.यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच ची स्थापना केली आहे.
या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तेल्हारा तालुका अध्यक्षपदी श्रेयश लोणकर,ता. उपाध्यक्ष पदी गोकुळ हिंगणकर,निलेश बहाळ,हर्षल पोटे,ता.सचिव पदी प्रथमेश लोणकर,ता. सहसचिव पदी विजय कुयटे,गोपाल सुंदरकार, ता. संघटक पदी शुभम थोटे, ता. संपर्क प्रमुखपदी अमोल तळोकार ,ता. प्रसिद्धी प्रमुखपदी विशाल जळमकर, प्रवक्ते पदी कौंतेय भोपळे,स्वप्निल फोकमारे,ता.मार्गदर्शक पदी दिलीप लोणकर तर सदस्यपदी संतोष पवार,अमोल अनासाने,पंकज बांबडे,शुभम चिकटे,मुन्ना ताथोड,नंदकिशोर वराईकर,अजय दांडगे,आशिष शेळके,हर्षल आखरे,स्वप्नील भारसाकळे,यांची नियुक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरदादा वानखडे व अकोला जिल्हाध्यक्ष प्रा.ततेशजी पेटे यांनी केली.
