प्रतिनिधी जालना
जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी ता.जि.जालना या शाळेत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जालना अंतर्गत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची RTPCR TEST करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे .सी.जी.यांनी कोरोना19च्या तिसरा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनुसार ग्रामिण भागात विद्यार्थांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणे व विद्यार्थांच्या अभ्यासात खंड पडणार नाही याची काळजी घेणे होय .
कष्टकरी शेतकरी ,मंजुरी करणारे यांची मुलेचे उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवुन शाळा बंदच्या काळात या समाजघटकातील मुलांचे शिक्षण अखंडपणे चालु राहील यांची सुध्दा योजना शाळेने केली. करोना विषाणुची साथ हे दुसरे महायुध्दानंदरचे जगासमोरचे मोठे संकट आहे.मानवी जीवनाच्या सर्वच बाजुंवर या संकटाने प्रभाव टाकला आहे.म्हणुन लाॅकडाउनचे धोरण अवलंबुन हा रोग रोग आटोक्यात आणण्याचा सर्व देशात प्रत्नन करण्यात आला.
तसेच कोराना काळात दीड वर्षापासुन शाळाबंद आहेत या काळात वेगवेगळे पर्याय शोधून मुलांचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यात प्रभावी अंमलबजावणीही व्यवस्थित झाली त्यामुळे यंदा शाळेमध्ये विद्यार्थांचे प्रवेश वाढत आहेत. त्यासाठी विद्यार्थीनी RTPCR TEST करून घ्यावे असे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.सी.विद्यार्थांना केले कारण जेणे करून तात्काळ कोरोना 19रूग्णाचे निदान होऊन औषधोपचार सुरू करून पुढील संभाव्य धोका टाळणे शक्य होईल असे मार्गदर्शन केले .
विद्यार्थांना RTPCR TEST महत्व व भयमुक्त वातावरण विद्यार्थांत निर्मान केले. यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जालना अंतर्गत ग्रामिण पथक मा.श्री.डाँ.अंकुशजी डोंगरे साहेब(वैद्यकिय अधिकारी जालना)तसेच मा.श्री.डाँ.सचिनजी दहिवाल साहेब जालना,डुकरी पिंपरी येथील मा.श्री.डाँ.बाळासाहेब काकडे साहेब व शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी व विद्यार्थीं व विद्यार्थींनी यांची RTPCR TEST करण्यात आली.
श्रीमती.कुलकर्णी.एस.आर., श्री.मदन.वाय.बी., श्री.सोनकांबळे.डी.एन., श्री.नागरे.पी.पी., श्रीमती.देशपांडे.ए.बी. श्री.जाधव.एल.बी., श्री.ठाकरे.एस.आर., श्री.राऊत.एस.बी., श्रीमती.खरात.एम.ए. आदीची उपस्थिती होती.
