जळगाव प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथील ग्रामपंचायत दप्तर गायब झाल्याचा आरोप, ग्रामपंचायत सदस्य चेतन चव्हाण, आणि कैलास चव्हाण, सदस्य यांनी केला आहे, जवळपास सहा महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये दप्तर नसल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितल्या आहे, ग्रामपंचायत मध्ये दप्तर नसल्यामुळे नागरिकांना मुलांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी रहीवासी दाखले आणि इतर कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याचे नागरिकांचे हाल होत आहेत, तसेच या संदर्भात जामनेर येथील गटविकास अधिकारी यांना कळविले असता ते सुद्धा दुर्लक्ष करत आहे, आणि ग्रामसेवक महिन्यातून एक वेळा येत असूनही सरपंच महीला यांनीही ग्रामसेवकाला काहीही न बोलता मनमानी कारभार सुरू ठेवला आहे, तसेच सरपंच महिला असून संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार नातेवाईक
बघत असल्यामुळे गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह संजय राठोड सामाजिक कार्यकर्ता,यांची नाराजी होत आहे, तसेच गावातील काहीही विकास न होत असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे, ग्रामपंचायतीचे बांधकाम जवळपास दीड वर्षापासून संपूर्ण झाले असून ग्रामपंचायत मध्ये एकही महापुरुषाचा फोटो लावलेला नसल्याचे समोर आले आहेत, संपूर्ण फोटो एका ठिकाणी जमा करून ठेवले आहे, तसेच ग्रामपंचायतीसमोर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे गावातील गटारीचे पाणी ग्रामपंचायत जवळ साचत आहे, गावात कोणत्याही योजना राबविण्यात येत नसून आधारकार्ड जमा करून सरपंच आणि ग्रामसेवक नागरिकांची दिशाभूल करत आहे, यावेळी गावातील सदस्यासह नारायण चव्हाण, जोतमल चव्हाण, लखीचंद राठोड, देवलाल चव्हाण, एकनाथ चव्हाण, देविदास चव्हाण, कालू चव्हाण, भरत चव्हाण, प्रवीण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होत
