दत्तात्रय शेळके प्रतिनिधी बोरगाव
अंबड तालुक्यातील धाकलगाव ते पिठोरी या गावच्या पाच किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी जालना-बीड महामार्गावरील धाकलगाव येथे सोमवारी(ता.2)दुपारी बारा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यापूर्वी मनसेच्या वतीने अंबडचे तहसीलदार यांना याबाबत लेखी निवेदन वडीगोद्रीचे मंडळा धिकारी भिसे यांना मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.यापूर्वी तहसिल प्रशासनाला निवेदन देऊन त्यात म्हटले होते की.प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास
रस्त्याच्या कामाबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. याप्रमाणे सोमवारी धाकलगाव ते पिठोरी सिरसगाव या पाच किलोमीटर रस्त्याचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा.ग्रामस्थांना न्याय मिळवुन देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे.रस्त्याच्या मागणीचे लेखी निवेदन अंबड तहसिल प्रशासनाला देण्यात आले आहे.याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके,जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ उढाण,नंदकुमार उबाळे,पंडीत बरडे, इम्रान पठाणआशिष आटोळे,अशोक सोलनकर, दत्तात्रय वाघमारे,आकाश गावडे,भाऊसाहेब चाबुकस्वार,नारायण जोडणार, भागवत ग्राम,भगवान खंडागळे,योगेश राठोड,अशोक गायके,विठ्ठल बिबे,फारुख पठाण, नेहाल पठाण,संजय शिंदे, अरुण मोटके सह आदीची उपस्थिती होती.
