शेख सज्जाद प्रतिनिधी लोणार
दि11/09/2021रोजी भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तफै आज शासकीय विश्राम गृह येथे मलकापूर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष रशीद जमादार साहेब यांना राज्य गौरव पुरस्कार व जळगाव जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मा. मुन्वर खान यांना राज्य स्तरिय जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे शहर कॉग्रेस कमिटी तफै त्याचा भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी दोन्ही मान्यवरांचा शाल श्री फळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार निळकंठ भाऊ फालक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी शहर कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी प्रास्ताविक केले माजी नगराध्यक्ष रशीद जमादार साहेब यांनी सत्काराला उत्तर दिले. मी कॉग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकताअसुन सतत सर्व सामान्य माणसाचे काम करीत असल्यामुळे असे पुरस्कार मिळतात.
मुन्वर खान यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मी कोरोना सारख्या महामारी मध्ये शेकडो लोकांना दोन वेळेचे जेवण देण्याचे काम करुन अनेक लोकांना त्यांच्या घरापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून पोहचवण्याचे काम केले आहे. मिटिंग अध्यक्ष माजी आमदार निळकंठ भाऊ फालक यांनी दोन्ही सत्कार मुर्ती चे स्वागत करुन मनोगत व्यक्त केले सुत्रसंचालन हमीद सर यांनी केले यावेळी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वाजीद भाई, आरोग्य सभापती जावेद मेमन, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, शैलेश नन्नवरे, मेहबूब खान , सागर कुरेशी, महेंद्र महाले, राजेश डोंगरदिवे, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे तालुका युवक विधानसभा अध्यक्ष इमान खान, महिला शहर अध्यक्ष यास्मिन बी, जिल्हा महिला उपाध्यक्ष हमिदा गवळी शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, दुर्गा सोनवणे, सपना पगारे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलिम गवळी सागर वानखेडे साहेब राम अवतार परदेशी,ता.अल्पख्याक अध्यक्ष अकील शाह इमरान शेख,सिध्दार्थ सपकाळे सुरेश सपकाळे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व तसेच शेवटी आभार प्रदर्शन शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सलिम गवळी यांनी आभार व्यक्त केले
