प्रतिनिधी शेख सजाद
आज लोणार घरकुल येथे ऑटो चालकांनी घेतले परिश्रम लोणार शहरापासून किमान तीन किलोमीटर अंतरावर असलेले घरकुल हे शहरातील सरोवराच्या काठावरील राहणारे लोक यांना तीन ते चार वर्ष आगोदार शासनाच्या आदेशाने यांचे राहते घर मोडून ती जागा नगरपालिकेने ताब्यात घेतली असून, तिथे राहणाऱ्या लोकांना घरकुल देण्यात आले. घरकुल दिल्यानंतर त्यांच्याकडे शासनाने प्रशासनाने पाठ फिरवली आहे, घरकुलावर जाणारा रस्ता आयटीआय कॉलेज पासून आत हा खड्ड्यात रस्ता का रस्ता खड्डा आहे समजत नाही तरी घरकुल वर प्रायव्हेट ऑटो चालक त्यांनी एकत्र येऊन रस्त्यातील काही प्रमाणात खड्डे बुजुन मोठ मोठाले दगड खोदुन काढले असून रस्ता हा आटो जाण्या येन्या साठी सुरळीत केला आहे, यावेळी ऑटो चालक, सैयद आबेद सैयद राजू राहुल वाघ, राजु पवार, शालिक इंगळे, चंद्रकांत डेंगले, सुनिल मदन उबाळे
शेक शमशेर उर्फ पपु भाई यांनी परिश्रम घेतले असून समाजसेवक सालर खान पठाण यांनी आपले मत व्यक्त केले की शासनाच्या आदेशाने आम्हाला आमचे राहते घर मोडून आम्हाला गावाच्या बाहेर वाऱ्यावर आणून सोडले आहे जसे की शासनाची कोणतीही योजना कोणत्याही प्रकारची सुविधा आम्हाला नसून नगरपरिषद तर्फे फक्त घंटागाडी खेळत आहे व अधून मधून येत जात राहणारी विद्युत ची व्यवस्था शासनाकडून झालेले असून.
अंगणवाडी नाही, वेळेवर पिण्यासाठी पाणी नाही, इतक्या मोठ्या लोकसंख्या मध्ये एकही शासकीय राशन चे दुकान नाही ,गावात येण्या-जाण्यासाठी रस्त्याची अवस्था अशी आहे की रस्त्यामध्ये स्विमिंग पूल झालेले आहे, तरी आमचे आवाज शासनापर्यंत आपल्या वृत्तपत्राद्वारे जाईल अशी अशा करतो ,त्या प्रसंगी कामगार सेना तालुकाध्यक्ष शेख रफीक, माजी नगर उपाध्यक्ष स्वर्गवासी शेख अनामत यांचे सपुत्र शेख अजमत , बुलढाणा जिल्हा एनएसयूआय सरचिटणीस शेख जुनेद , प्रायव्हेट कर्मचारी असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष शेख गुलाब , आदि घरकुल चे युवक उपस्थित होते.
