Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रवाशांची होतेय गैरसोय

Responsive Ad Here

 देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव  चाटे

     दीडपट भाडे आकारून ही बस पोहोचत नाही वेळेवर गाडीत बसण्यापूर्वी ड्रायव्हर कंडक्टरने द्याव्या सूचना की गाडी जेवण्यासाठी कुठे थांबेल. देऊळगाव राजा वरून नागपुर जाणारी औरंगाबाद नागपूर एम एच 20 बी एल 3805 देऊळगाव राजा वरून सात वाजता चिखली कडे निघाली रस्त्यात इन्स्पेक्टरने तिकीट चेकिंग साठी थांबवणे परत तीच गाडी देऊळगाव मही मध्ये चेकिंग इंस्पेक्टर पारवे सह मॅडम नी तपासली पुढे अंढेरा फाट्यावर प्रवासी घेऊन हीच गाडी मेरा फाट्यावर थांबत नाही देऊळगाव राजा वरून मेरा फाटा उतरण्यासाठी प्रवासी घेत नाही मेरा फाट्यावरून नागपूर जाण्यासाठी प्रवासी घेत नाही परंतु पुढे दोन मिनिटाच्या अंतरावर धाब्यावर मात्र थांबते या गाडीचे भाडे सर्वसाधारण गाड्या पेक्षा दीडपट जास्त आहे प्रवासी फाट्यावर  दोन दोन तास वाट पाहत बसतात पण तिथे स्टॉप नाही मेरा फाटा येथे थांबा असावा अशी विनवणी करत आहे गाडीच्या समोर दहा लोक उभे आहेत परंतु स्टॉप नसल्यामुळे चालक वाहक त्यांना घेऊ शकत नाही आणि गाडी सुद्धा खाली आहे.

     यावर शासनाला काही उपाययोजना करता येईल काय प्रवाशांकडून दीडपट भाडे आकारून गाडी ठराविक वेळेपेक्षा दीडपट टाईम घेते हेसुद्धा चुकीचे आहे लाल परीचा सर्वांना अभिमान आहे कारण  गोरगरिबांना सुख-दुःख च्या काळात निभावून नेले आहे परंतु हिरव्या रंगाच्या सुपरफास्ट प्रवाशांकडून  दीडपट भाडे घेऊन वेळेवर पोहोचत नाही व पाच मिनिटांनी परत हॉटेलवर थांबतात तेव्हा प्रवाशाची नाराजी होणे स्वाभाविकच आहे कुणाला ऑफिसमध्ये जायचं असतं तुला दवाखान्यात जायचं असतं कोणाच्या नोकरीला इंटरव्यू असतो म्हणून गोरगरिबांचे म्हणणे शासनाने प्रशासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे ज्यांच्या पर्यंत पोहोचते त्या सक्षम व्यक्तींनी पाठपुरावा करून सर्वसाधारण जनतेला सुविधा द्यावी चालक वाहक व इन्स्पेक्टर यांनी ड्रेसवर बॅच बिल्ला लावावेत सर्वांना दिसेल असे लावावेत पॉकेटमध्ये ठेवू नये कारण ते तक्रार रजिस्टर एकतर दाखवत नाहीत व असेल तर मेंटेन सुद्धा करत नाहीत .

      जाऊद्या ना सर कशाला नाव लिहिता यापुढे असे होणार नाही असे म्हणतात .आणि दररोज दररोज तेच होते, याकडे डिपारमेंट न लक्ष देण्याची गरज आहे .प्रवाशांनी झालेल्या असुविधा बद्दल अर्जावर सह्या दिल्या मात्र चालक आणि वाहक यांनी सह्या न देता ,नाव न छापण्याच्या विनंती केली. शेवटी सव्वा नऊ वाजता बस चिखलीला पोहोचली.