जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्थे तर्फे शिवा हिरपूरकर वय 30 वर्षे रा.माया नगर,गोपाल नगर,अमरावती यांच्या पायाला सायकल वरून पडल्यामुळे त्याला दगडाचा मार लागला होता त्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्रेसिंग सुद्धा केले होते तसेच घरी आता च्या बाटलीमध्ये शेख दिल्याने ती जखम पुन्हा वाढले त्या जखमीला पूर्ण वीस ते पंचवीस दिवस झाले आता त्यांचा पायामध्ये अडया पडण्याची वेळ आली आहे.
घरची परिस्थिती हालकीची असल्यामुळे त्यांच्याजवळ काहीच पैसे नसल्यामुळे तसेच वडील नसल्याने घरी तो एकटाच कमावता व्यक्ती होता तसेच सेव लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था गोपाल नगर यांनी एक हात मदतीचा म्हणून समोर आले उपचारासाठी सेव्ह लाईफ फाऊंडेशन तर्फे 7351 रु ची मदत म्हणून करण्यात आली .तसेच सेव्ह लाईफ फाऊंडेशन च्या टीम ने डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून मदत केली .मदत करतांना सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक : अमर कडू , सचिव : गौरव नाखले, सुधीर मानके, अंकुश लाटेकर, रवी अडसोड,अभिषेक कुटाफळे, चंदन आघाशे,राहुल हांडे,सिद्धार्थ खोब्रागडे, योगेश पावडे इत्यादी हजर होते.
