अमरावती प्रतिनिधी
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी तहसील सभागृह नांदगाव खंडेश्वर येथे हरित शपथ घेतली. ही शपथ राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे देण्यात आली. माननीय डॉ . अलका भिसे, प्राचार्य, विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खं., महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक डॉ .सुचिता खोडके ,श्री पुरुषोत्तम भुसारी,तहसीलदार नांदगाव ख,श्री भगवान राठोड आणि श्री. देवेंद्र वासनिक नायब तहसीलदार नांदगाव खं. या शपथ विधीला उपस्थित होते.
वृक्ष हा शब्द आठवला की, संत तुकारामाचे वचन आठवते ते म्हणजे "वृक्ष वल्ली आम्हा सोयरी" ... परंतु, आज हे विस्मरणात गेले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. संपूर्ण जगात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत. ज्यांचे भयंकर परिणाम दिसायला लागले आहेत. आज सर्व प्रदेश, पहाड, डोंगर ,जंगल हे वृक्ष नष्ट झाल्याने ओसाड पडले आहेत. औषधी युक्त वनस्पती दुर्मिळ झाली आहे.
वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस कमी पडतो या मूळे सृष्टीचे वैभव संकटात आले आहे आणि म्हणूनच आपली वसुंधरा सदैव हरित राहो यासाठी राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवणं निसर्गाशी संबंधित वायू, अग्नि,जल, पृथ्वी, आकाश या पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियानाचे’ उदघाटन राज्याच्या ‘पर्यावरण व वातावरणीय बदल’ मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात 395 शहर व 329 मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विविध उपक्रम राबविन्यात येणार आहे .या अभियानाची सुरवात ही हरित शपथ घेऊन करण्यात आली. ही शपथ डॉ. कविता काकडे, सह कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी दिली. आपल्या पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी शपथ माझी वसुंधरा अभियानातर्गत घेण्यात आली . हरित शपथ ग्रहण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना मुख्य कार्यक्रम अधिकारी श्री निशांत जैसवाल ,महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग तसेच शेतकरी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
