प्रतिनिधी लोणार
दिनांक 3 सप्टेंबर2021 रोजी शेख सज्जाद राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष यांनी जिल्ह्यातील बांधकाम कामगार मजूर वर्गाला न्याय देण्यासाठी. सरकारी कामगार अधिकारी आ.शि. राठोड यांच्याशी सविस्तर चर्चा करून ऑनलाईन- ऑफलाईन मध्ये चालू असलेला गोंधळ सोडून घेतला, तसेच यांनी काही महत्वाची सूचना देखील केली. की ऑनलाइन फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर हा खूप
महत्त्वाचा आहे मोबाईल नंबर वर येणारा(sms) मेसेज वेळोवेळी सूचना आम्ही मोबाईलच्या (sms)एस एम एस द्वारे लाभार्थीला कळतो म्हणजे, लाभार्थीला ऑफिसला येण्याची गरज पडत नाही तसेच भरलेल्या फॉर्म ची सविस्तर अपडेट या मेसेज द्वारे आपल्याला कळते याच्यामध्ये कामगार चा वेळ आणि पैसाही वाचतो. अशी इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जास्तीत जास्त कामगारांनी बांधकाम कामगार योजना चा लाभ घ्यावा असे आव्हान शेख सज्जाद यांनी केले.
