Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या लोणार तालुकाध्यक्ष पदी संतोष पुंड यांची निवड

Responsive Ad Here

बुलडाणा/प्रतिनिधी शेख सज्जाद

      न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी  संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या लोणार तालुकाध्यक्षपदी येथील सकारात्मक वृत्त लिखाण करुन आपली समाज घटकांवर आगळीवेगळी छबी निर्माण करणारे संतोष काशीराम पुंड यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,राज्य सचिव अनिल चौधरी,पुणे तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक, महासचिव सिध्दार्थ काळे मुंबई,जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव,यांच्या आदेशानुसार पत्रकार संरक्षण समितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे,बुलडाणा तालुकाध्यक्ष समाधान चिंचोले,यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली.

    संतोष कांबळे हे एक सकारात्मक वृत्तीचे पत्रकार आहेत समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील असा आशावाद बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केला आहे.संतोष पुंड यांची पत्रकार संरक्षण समितीच्या लोणार तालुक अध्यक्षपदी निवड होताच संपुर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्यावर विविध सामाजिक संघटनांकडून कौतुकाचा वर्षांव होत आहे.