Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड येथे युवकाची आत्महत्या

Responsive Ad Here

प्रतिनिधी हिवरखेड जितेश का रिया

   

मृतकाचे चिठ्ठीवरून सासरा व आबा सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

हिवरखेड येथे मुकेश श्रीकृष्ण डोंगरे वय 28 या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतकाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीनुसार सासरा व आबासासरा यांच्यावर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सविस्तर असे की, फिर्यादी रमेश तुकाराम लोणकर राहणार टूनकी जि बुलढाणा यांची बहीण मंगला डोंगरे आणि भाचा मुकेश डोंगरे 28 हा हिवरखेड येथे वास्तव्यास होता. . दिनांक 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सदर युवकाने राहत्या खोलीत गळफास घेतल्याची घटना उजेडात आली. सदर घटनेची माहिती सुरेश ओंकारे यांनी कुटुंबियांना फोन करून दिली. मुकेश डोंगरे ह्याने काही दिवसांपूर्वीच मालठाना येथील एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. 

मृतकाच्या खिशातून एक चिठ्ठी मिळून आली त्यामध्ये  बायको चे बाबा आले होते त्यांनी आजीची तब्येत बरोबर नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी व पत्नी सोबत तेल्हारा गेलो असता पत्नीचे बाबा आणि आबा यांनी आम्हाला मारझोड केली व पत्नीला घेऊन गेले. मी माझ्या पत्नीसाठी काहीपण करू शकतो. 

त्यांनी तिला जबरदस्तीने नेलं.  आणि माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर पत्नीचे बाबा आणि आबा हे जबाबदार राहणार असे चिठ्ठीत लिहिले होते. मृतकाच्या आईने सुद्धा हीच माहिती दिली व सांगितले की मुकेशला सासरा गजानन धामोडे व आबा सासरा पुंडलिक धामोडे यांनी मारहाण केल्यामुळे तो सतत तणावात होता. त्याच कारणामुळे मुकेश याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले.  मुकेश च्या प्रेम विवाहाला या दोघांचा विरोध होता. त्या कारणावरून त्या दोघांनी मुकेशला सतत त्रास देऊन मारहाण केली. 

  त्यांच्या त्रासाला कंटाळून मुकेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे मरणास ते दोघे जबाबदार आहेत. अशी फिर्याद हिवरखेड पोलीस स्टेशन ला दिल्यावरून हिवरखेड पोलिसांनी मृतकाचा सासरा गजानन धामोडे आणि आबासासरा पुंडलिक धामोडे रा मालठाना ता तेल्हारा ह्या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार धीरज चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत.