Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये

Responsive Ad Here

भीमराव चाटे  प्रतिनिधी देऊळगाव राजा

        आज सकाळी सीईटी पेपर देण्यासाठी डॉक्टर पद्मश्री कोलते कॉलेज वर जाण्याकरता विद्यार्थ्यांनी गाड्या पकडल्या काहींनी मोटरसायकलवर काही प्रायव्हेट गाडीवर चालले होते परंतु पुरामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर मलकापूरला पोहोचू शकत शकले नाहीत. दुसऱ्या मार्गाने चिखली अमडापूर उंद्री मार्गे मलकापूर जाण्यासाठी रस्ता शोधत आहेत आणि पुढच्या पुलावर ही पाणी असेल की नाही हे सांगता येत नाहीत, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऑनलाईन येत आहेत.

     काही विद्यार्थी रडत आहेत की आमचा परीक्षेचा वेळ चुकला, पावसाच्या पुरामुळे ते पोहोचू शकलो नाही आमचे  नुसकान व्हायला नको. काही विद्यार्थ्यांचा अजून टाईम बाकी आहे परंतु शासनाने नैसर्गिक आपत्ती पाहून विद्यार्थ्यावर आलेलं संकट लक्षात घेता त्यांना पुन्हा पेपरला बसण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती करत आहे. सर्व स्तरावरून पावसामुळे रस्ते बंद असल्याचा पुरावा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा पेपरची नवीन वेळ तारीख  देण्यात यावी अशी मागणी होत आहे तसेच महाराष्ट्र सैनिक करियर अकॅडमी दे राजा बुलढाणा संचालक मंडळाकडून माजी सैनिक मित्रांकडून व विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विनंती करण्यात येत आहे.   याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी.