Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा-पॉवर ऑफ मिडीया पत्रकार संघटनेची मागणी

Responsive Ad Here

                           

तालुका प्रतिनिधी / नांदगाव खंडेश्वर प्रदिप रघुते

     तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन           

नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे सुपुत्र स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सर्वप्रथम शिक्षणाची गंगा बहुजन समजकरिता आणली होती. तसेच त्यांचे देशाच्या विकासात अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे.भाऊसाहेब देशमुख यांनी आपले संपूर्ण जीवन दलित, शोषित,व बहुजन समाजाच्या उत्थाना करीता व्यतीत केले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाहिजे तसा सन्मान मिळत नसल्याने  पॉवर ऑफ मिडीया पत्रकार संघटना नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून 27 डिसेंबर रोजी भाऊसाहेबांच्या जयंती दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करून स्व. भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी पॉवर ऑफ मिडीया विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

     यावेळी तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे, सचिव सागर सव्वालाखे, सदस्य अथहर खान, सुनील बनसोड,अमोल दांडगे, शिवदास उईके, प्रदीप रघुते, प्रशांत झोपाटे,उमेश चव्हाण, अनिकेत शिरभाते, मनोज जैन,रमेश गंजीवाले, सागर गावनेर, नितेश कानबाले, प्रमोद देशमुख, पवन ठाकरे, संजय पवार, संदेश ढोके, अंकुश निमणेकर, योगेश राऊत, गणेश माटोडे, देविदास गाडेकर,यांच्यासह आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.