Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सिंदखेड राजा हनवतखेड नगरीत माजी सैनिकाचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा व रॅली

Responsive Ad Here

भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगावराजा  

      हनवतखेड नगरीत 26 वर्षे देश सेवा करून परत आलेले सैनिक हवालदार सुदाम देवराव वाघ यांचा सत्कार सोहळा26 सप्टेंबर लाच आयोजकांनी केला.आयोजक संदीप जायभाये कृषी शास्त्रज्ञ के व्ही नांदेड यांनी सर्वप्रथम गावाचा अभिमान असलेल्या सैनिकांचे सेवा दर्पण तयार केले,

 या सैनिक सेवा दर्पण मध्ये प्रथम स्थानी कॅप्टन योगेश शिवाजी वनवे, हवालदार गनर वसंत आंबादास जायभाये ,हवालदार चालक बद्री भगवान मांटे ,सैनिक ड्रायव्हर भरत गजानन जायभाये , माजी सैनिक रवी सूर्यभान जायभाये, सैनिक आनंता दत्तू वनवे, सैनिक चालक  सुनील जगन जायभाये जनरल ड्युटी, रायफल मॅन केशव नामदेव जायभाये रडार मेकॅनिक, सैनिक दिलीप हरीभाऊ जायभाये ,संदीप भगवान वनवे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर , क्राफ्ट मेन विकास शिवानंद जायभाये ,सैनिक गोपाल जायभाये सैनिक नितीन रंगनाथ वनवे ,यांचे एक सैनिक दर्पण बनवून भव्य बॅनर बनवले . सर्वासह सैनिकाने सर्वप्रथम ग्रामदेवतेचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले व सपत्नीक मिरवणूक उभे राहिले

ग्रामपंचायत सरपंच सौ आशा ताई संजय जायभाये ,उपसरपंच वर्षा कैलास जायभाये, तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर यादवराव जायभाये ,माजी सरपंच तथा माजी सैनिक श्रीराम तुकाराम वनवे व सुट्टीवर आलेली जवान सुनील जायभाये सर्व सहा सर्व  सैनिक जवान यांनी सत्कार सोहळा व रॅलीमध्ये भाग घेतला. समस्त गावकऱ्यांनी सैनिक सुदाम वाघ साहेबांची सपत्नीक मिरवणूक काढली आणि रुमाल टोपी व साडी चोळीचा जोड आहेर देऊन महिला भगिनींनी त्यांना ओवाळले त्यांचे औक्षण केले व पुढील आयुष्यामध्ये जशी देशाची सेवा केली.त सेच समाजाची व


गावची सेवा तुमच्याकडून घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सैनिक सुदाम वाघ यांनी कर्तव्यावर असताना ची काही प्रेरक प्रसंग सांगून लोकांना रोमांचित केले. " काश्मीर मे सर्दी नही होती   मुंबई मे गर्मी नही होती   हम भी घर पर हर सण-उत्सव मनाते अग बदन पे आर्मी की वर्दी नही होती  " भारत माता की जय,  वंदे मातरम जय जवान जय किसान घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला हनवतखेड या गावामध्ये प्रत्येक गावकऱ्यांनी सैनिकांच्या या कार्यात जातीने हजेरी लावली व कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि लोकांनी देशभक्ती च्या गाण्यावर नाचून गाऊन तल्लीन झाले सैनिकाच्या परिवाराने सुद्धा गावकऱ्यांचे मनोमन आभार मानले व तुम्ही दिलेला हा सत्कार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही असे सांगितले अशाप्रकारे देशभक्ती मे वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

 महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा संचालक यांनी संकलन करून प्रकाशित केले .जय हिंद सैनिक डायरी क्रमशः