प्रतिनिधी अमरावती जयकुमार बुटे
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. वृक्षांची लागवड व जोपासना करणे ही सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्यक आहे. आज सगळ्यांचे लक्ष पर्यावरणाकडे तर लागलेले आहे.
जनपदोध्वंस झाला म्हणजे पर्यावरणाचे संतुलन बिघडले, वातावरणात विषारी द्रव्ये पसरली तर मनुष्याला काय काय भोगावे म्हणूनच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत शाखा अमरावती, जिल्हा युवा अध्यक्ष ओम किशोर मोरे हे नेहमीच नवनवीन कल्पना समाजापुढे मांडत असतात, त्यात मधून हा एक उपक्रम आहे वृक्ष दिनानिमित्य मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी एक आदर निर्माण व्हावा या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी ओम किशोर मोरे जागतिक वृक्ष दिनानिमित्त रुक्ष भेट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी कडूनिंब, भोसा, सिताफळ, जांब या वृक्ष प्रजातीचा रोपांचे वाटप करण्यात आले.
