Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत विकास कामे पूर्ण

Responsive Ad Here

   जामनेर प्रतिनिधी

     संतोषी माता नगर व शिवनगर या भागात रस्ते गटारी कामे पूर्ण


जामनेर तालुक्यातील पहूर पेठ ग्रामपंचायत च्या वतीने पहूर गावात विकास काम झपाट्याने वाढ होत आहे गावातील संतोषी माता नगर शिवनगर वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा या सर्व वार्डात भूमिगत गटारी रस्ते तसेच सामुदायिक सभागृह चार ठिकाणी गावात मुतारी असे विविध विकास कामे आज पूर्ण झालेले असून या कामाची पाहणी लोकनियुक्त सरपंच नीता ताई पाटील धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे भारत पाटील संदीप बेढे ईका पैलवान सलीम मौलाना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावात झालेल्या विकास कामाची पाहणी केली.

      संतोषी माता नगर शिवनगर या भागात सात लाख रुपये मंजूर झालेल्या सामुदायिक सभागृहाची तसेच काँक्रिट रस्ते गटारी यांची आज पाहणी केली गावात 50 लाखाचे काम आज पूर्ण झाले असून अजून काही भागातील कामे अपूर्ण आहेत ते लवकर पूर्ण होणार असल्याचा विश्वास लोकनियुक्त सरपंच नीता ताई पाटील रामेश्वर पाटील राजधर पांढरे यांनी बोलताना सांगितले गावात विकास कामे होत असल्याने नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायत चे अभिनंदन केले आहे याप्रसंगी शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे चेतन रोकडे अबू तडवी गणेश मंडलिक युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते