प्रतिनिधी आनंद जाधव
भर पावसांत आमदार कैलाशजी गोरंट्याल यांनी केले स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. दरवर्षी प्रमाक्षणे यां हीं वर्षी 25 सप्टेंबर रोजी स्व.अण्णासाहेब पाटील चौक जालना येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते.मात्र मुसळधार पावसामुळे कार्यक्रम होईल का नाही अशी शाशंकता होती मात्र नियोजित वेळेत आमदार कैलाश गोरंट्याल यांनी कार्यक्रम स्थळी दाखल होत संपूर्ण कार्यक्रम पावसात भिजत पूर्ण केला.यावेळी स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचे काम आणी सुशोभीकरणाच्या कार्यास कोव्हीड मुळे विलंब झाला असून हे कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.
यावेळी मा.नगरअध्यक्ष भास्करावजी अंबेकर ,मा.उपनगरअध्यक्ष. राजेशजी राऊत, राम सावंत नगरसेवक विष्णु पाचफुले ,संजय भगत,अरविंद देशमुख , अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, अँड.शैलेश देशमुख, योगेश पाटील ,मंगेश कापसे, अरुण घडलिंग,सुभाष चव्हाण,मंगेश मोरे, संतोष काथोटे,,रवी सूर्यवंशी,गायकवाड सर, बालाजी माने,योगेश कदम आदीची उपस्थिती होती.
