मो.असलम परवेज: तालुका प्रतिनिधी
नुकतेच लोणार पोलीस स्टेशन मध्ये बदलीने रुजू झालेले ठाणेदार प्रदीप ठाकूर यांचा जमियते उलमाए हिंद शाखा लोणार च्या शिष्टमंडळाच्या वतीने शुक्रवारी दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी जंगी सत्कार करण्यात आले. ठाणेदार प्रदीप ठाकुर हे ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या जागी बदलीने मागच्या आठवड्यात रुजू झालेले आहे.
कर्तव्यदक्ष आणि इमानदार पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रदीप ठाकूर लोणार नगरीला लाभले यानिमित्ताने जमितच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ, मिठाई, विविध प्रकारचे खुशबूदार ईतर तसेच सप्रेम भेट देऊन त्यांचे जंगी सत्कार करण्यात आले. त्यानंतर शहरांच्या प्रगतीशी संबंधित असलेल्या अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आले.
या अगोदर लोणार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी मागील दोन वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून लोणार करांच्या हृदय मध्ये आपली एक विशिष्ट ओळख व छाप निर्माण करून गेले. कोरोना सारख्या अति भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या परिस्थितीला हाताळले त्याच प्रकारे नवीन ठाणेदारांना सुद्धा लोणारचे प्रगती व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यात आले.
यावेळी जमियत उलमाचे लोणार तालुका अधयक्ष हाजी मोहम्मद रिजवान मोहम्मद नासेर (जडडा), शहराध्यक्ष हाफीज शेख आयाज साहब, हाजी शेख मसूद सेठ, हाजी रिजवान खान करामत खान, शेख गफूरभाई, वसिफ अहमद खान मनसब खान तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
