Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देऊळगाव राजा हायस्कूल मध्ये एनसीसी कॅडेट सिलेक्शन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी देऊळगाव राजा भिमराव  चाटे 

          आज देऊळगाव राजा हायस्कूल दे राजा मध्ये एनसीसी कॅडेट सिलेक्शन करण्यात आले त्यात प्राचार्य आर बी कोल्हे सर एनसीसी ऑफिसर संतोष वसंतराव मुळे सर 13 महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे सैनिक किशोर सिंग सैनिक निखिल थापा व महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी संचालक भीमराव महादेव चाटे समक्ष सर्वप्रथम मुलींचे नंतर मुलांचे वजन उंची व शारीरिक मापदंड मोजण्यात आले लेखी पेपर घेऊन पात्रता निवड करण्यात आली एनसीसी ऑफिसर संतोष मुळे साहेबांनी एनसीसीचे शिक्षण तक्ते ऑर्गनायझेशन व सध्या कोरोना परिस्थिती असल्यामुळे नियमित  ऑनलाइन क्लास वर प्रॅक्टिकल दाखविल्या जाते त्याबद्दल सांगितले. 


    एनसीसी चे ए, बी, सी सर्टिफिकेट चे फायदे सांगून पुढे आपण एनसीसी जॉईन केलेले असताना तीन वर्षे शाळा सोडता येणार नाही, हायस्कूल बदलता येणार नाही, लग्न करता येणार नाही ,अधिक वजन व कमी उंची चे विद्यार्थी घेता येणार नाही अशा सूचना दिल्या जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कॅम्प होईल व सरकारी खर्चातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल खामगाव पुणे दिल्ली व बाहेर देशातही त्या प्रत्येक कॅम्पला हजर राहणे अनिवार्य राहील असे प्राचार्य श्री कोल्हे सरांनी सांगितले सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्व कामे नीटनेटकेपणाने व वेळेवर कशी करावी हे एनसीसी शिकवते वेळेची किंमत व जीवनातली सरलता डिसिप्लिन शिस्त हे एन सी सी शिकवते नैसर्गिक आपदा भूकंप महापूर बाढस्थितीमध्ये पॅरामिलिटरी फोर्स एनसीसी काम करते 

    पर्यावरण सेवा सोशल वर्क मध्ये एनसीसी काम करते असे निवड करणारे सैनिक किशोर सिंग व निखील थापा यांनी सांगितले अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी नाराज होण्याची गरज नाही तुमच्यासाठी पुढील वर्षी संधी मिळेल व आपल्या मापदंड यामध्ये जी काही कमी कशी आहे ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा ना लाभ ना तोटा या तत्त्वावर आपणास ट्रेनिंग देऊन पूर्ण करू वजन वाढलेल्या मुलांचे वजन कमी करू त्यासाठी पालकांनी 80 5556 8866 वर कॉल करावा असे मा सैनिक मित्र फाऊंडेशन अध्यक्ष भीमराव  चाटे यांनी सांगितले उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एनसीसी जॉईन केलेल्या मुलांची अभ्यासाची थोडी अडचण येईल कारण त्यांना प्रत्येक कॅम्प अटेंड करणे जरुरी राहील त्या प्रत्येक कॅम्पच्या वेळेतला अभ्यास अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागेल हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे व आज पासून आपण महाराष्ट्र नॅशनल क्रेडिट कोर पॅरामिलिटरी फोर्स चा एक हिस्सा असून देशासाठी व स्वतःसाठी शिल्लक चा वेळ देऊन अभ्यास करावा लागेल याची जाणीव ठेवावी 23 मुली J W जूनियर विंग 2021 22 सहा रिझर्व प्रतिक्षित

 वS W सीनियर विंग 44 मुलांची निवड करण्यात आली