जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
नाहीतर शेतकर्यासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच मनसेचा इशारा.
जालना तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची सोयाबीन कापूस तूर मूग उडीद भुईमूग ऊस व फळबाग तसेच द्राक्षे या पिकांचेपूर्णपणे नुकसान झालेले आहे तरी राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा.
तसेच पंचनामे न करता हेक्टरी 100000 (एक लाख रुपये) नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी नसता शेतकर्यासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत मनसेने नायब तहसीलदार मोरे मॅडम तहसील कार्यालय जालना यांना निवेदन दिले आहे निवेदन देताना जालना तालुका अध्यक्ष कृष्णा भाऊ खलसे पाटील तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष राम कातकडे कृष्णा पिसोरे बाळासाहेब मगर महादेव चोरमारे विलास घाटे योगेश चौधरी विठ्ठल हंदारे आदी उपस्थित होते
