जयकुमार बुटे अमरावति प्रतिनिधि
प.पु.स्वामी रामदेवजी महाराज यांनी पतंजली च्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात कृषी व फलोत्पादना वर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करावा -आमदार रवी राणा यांनी मुंबई येथे योगगुरु स्वामी रामदेवजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी.
अमरावती येथील नांदगाव पेठ पंचतारांकित एम आय डी सी मध्ये पतंजली च्या माध्यमातून संत्रा ,डाळिंब ,केळी ,आवळा ,सीताफळ, सोयाबीन ,मका, मुंग ,आदी फळे व पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची विनंती आमदार रवी राणा यांनी स्वामी रामदेवजी महाराज यांना केली. लावकरच अमरावती येऊन जागापाहणी करण्याची रामदेवजी महाराज यांची आमदार रवी राणा यांना ग्वाही
मेळघाटातील आदिवासींना स्वाभिमानाचा रोजगार मिळावा यासाठी मोह मोहफुल या औषधयुक्त नैसर्गिक फळांचा वापर करून त्यापासून आयुर्वेदिक औषधी निर्माण केल्यास धारणी-चिखलदरा सह मेळघाटातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल व आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही-स्वामी रामदेवजी महाराज यांचेसमक्ष आमदार रवी राणा यांनी मांडली भूमिका पतंजली ने अमरावती येथे फळे व कृषी उत्पादने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील इतर शेतकऱयांना त्याचा लाभ होईल त्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळेल,शेतकरयांना हक्काची बाजारपेठ मिळेल व विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल असे आमदार रवी राणा यांनी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या निदर्शनास आणून दिले.
आपल्या लाडक्या शिष्याच्या म्हणजेच आमदार रवी राणा यांच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करून आपण लवकरच अमरावती येऊन जागापाहणी करू व शक्य तेवढ्या लवकर अमरावती मध्ये हजारो लोकांना रोजगार मिळेल असा मोठा कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग स्थापन करू असे अभिवचन स्वामी रामदेवजी महाराज यांनी आमदार रवी राणा यांना दिले.
मुंबई येथे झालेल्या गुरू शिष्याच्या या महत्वपूर्ण बैठकीचे फलित लवकरच अमरावती जिल्हावासीयांना दिसेल व विकासाची दूरदृष्टी बाळगून जिल्ह्याच्या औद्योगिक व रोजगारनिर्मिती विकासासाठी सदैव धपडणाऱ्या आमदार रवी राणा यांच्या तळमळीच्या प्रयत्नामुळे शहर व ग्रामीण भागातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल असा विश्वास जिल्हावासीय व्यक्त करीत आहेत.
