राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
संत हे परमार्थामधला जातीवाद संपवण्या करताच येत असतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताजुद्दीन महाराज शेख. महाराजांनी सबंध महाराष्ट्राला जाता जाता संदेश दिला. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. महाराजांचे कीर्तन आतील शेवटचं प्रमाण होतं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते.
आणि शेवटचं वाक्य असं होतं कि एका मुसलमानाने मराठ्याला सांगावं की तू माळ घाल. हा अधिकार फक्त वारकरी संप्रदायामध्येच चाहे. हे वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व आहे. संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. त्याच्या वर्णनाला ही किंमत नाही किंमत आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या कर्तुत्वाला. हे आज महाराजांनी संबंध महाराष्ट्राला हा संदेश दिला. तुकोबारायांचे शब्द आहेत. कबीर मोमिन लतिब मुसलमान सेनान्हावी जान विसनुदास. म्हणुन वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही त्याच्या कर्तुत्वाला आहे. प्रत्येक जातीत संत निर्माण झाले आणि प्रत्येक संत हे श्रेष्ठच आहेत. हे ताजुद्दीन महाराजांनी दाखवून दिले.
आणि महाराज म्हणाले. एवढं सांगून जर एखादा माणूस परमार्थामध्ये जातिवाद करत असेल तर त्याला खून भी पाक नरकात जावे लागते. तुकोबारायांच्या समकालीन संत. रामेश्वर शास्त्री यांचे प्रमाण आहे. वैष्णवा ची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभी पाक. महाराज म्हणतात की त्याला कुंभीपाक नरका मध्ये जावे लागते. म्हणून हे पाप कोणाच्या हि हाताने घडूनये म्हणुन संत अवताराला येत असतात. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. हाच विषय रात्री महाराजांनी कीर्तनात मांडला. आणि शेवटचं प्रमाण होतं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळ येते.
हे प्रमाण म्हणून महाराजांनी आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केला. अशा थोर थोर महात्म्यांना या जगांना योग्य दिशा दाखवण्याकरता पुन्हा पुन्हा भगवंताने या पृथ्वीतलावर पाठवाव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. महाराजांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली.
