गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल:शनीवारी २५सप्टेंबर रोजी आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते जलपूजन होऊन अंजनी धरणाचे तीन दरवाज्यांपैकी दोन दरवाज्यांच्या कळ दाबून धरणाच्या जलसाठ्यातून नदीपाञात जवळपास १९०क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.
यावेळी गिरणा पाटबंधारे उपविभागाचे सुभाष चव्हाण, विजय जाधव,लोकांक्षी पांडुरंग पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, रमेश महाजन, जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर व राजेंद्र चौधरी, दिलीप रोकडे,नगरसेवक चिंतामण पाटील, अनिल महाजन आनंदा चौधरी,शालीग्राम गायकवाड, नितीन बिर्ला ,राजेंद्र महाजन,नगरसेवक कुणाल महाजन,परेश बिर्ला आदी उपस्थित होते.
अंजनी धरणात २५सप्टेंबर रोजी पाणीपातळी २२५.८०मीटर असून एकूण पाणीसाठा १६.०७८द.ल.घ.मी आहे. अंजनी धरणाच्या गेट ऑपरेशन शेड्युलनुसार शनीवारी दुपारी १वाजता धरणामधून पाण्याचा विसर्ग नदीपाञात सोडण्यात आला.
विशेष हे की, गेल्या वर्षी धरण ऑगस्ट महीन्यात पूर्ण क्षमतेने भरलेले होते माञ या वर्षी तब्बल एक महीना उशिरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
आ. चिमणराव पाटील हे अंजनी धरणस्थळावर जलपूजन करताना सोबत आनंदा चौधरी, नानाभाऊ महाजन, राजेंद्र चौधरी, दिलीप रोकडे, किशोर निंबाळकर, चिंतामण पाटील व इतर मान्यवर.
