संदीप मस्के प्रतिनिधी बुलढाणा
प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या वतीने मा ना श्री उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे नुकसानभरपाई ची मागणी सतत सुरू असलेल्या संततधार व मुसळधार अतीवृष्टिच्या पावसाने लातुर जिल्ह्यातील सर्वदूर पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे आतोनात नुकसान झाले आहे आगोदरच आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल झालेला यात परत निसर्गाच्या लहरीपणामुळे तो आणखीण मेटाकुटीला आलेला आहे,त्यात शासनाने व प्रशासनाने शेतातील पिकाच्या नुकसानीच्या पंचनामा न करता सरसकट लातुर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुण सर्व नुकसानग्रस्त *शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्यावी* वाहुन गेलेले रस्ते व फुले यांची दुरुस्ती करावी,असी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव ता अहमदपूर प्रहार संघटनेचे शहरअध्यक्ष बाळू आमले यांनी केली आहे लातुर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून परत एकदा मुसळधार पावसाने थैमान घातले असुन याठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटी अतीवृष्टि झाल्यने सर्वत्र हाहाकार माजला आहे .
जिल्ह्यातील सर्व नदि तलाव ओहरफुल झाले आहेत तर काही ठिकाणी पुलावरून पाणी जाऊ लागल्याने अनेक गावांच्या संपर्क तुटला आहे तर ठिकाणी रस्ते व फुलेच वाहुन गेले आहेत,शेतात तयार सोयाबीन भिजुन शेंगांना कोब फुटत आहेत तसेच सोयाबीन सडत आहेत करीता शासनाने पंचनामे न करता सरसकट लातुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार ची मदत करावी अशी मागणी मा ना श्री उध्दवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे प्रहार संघटनेच्या वतीने किनगाव प्रहार शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्यासह किनगाव प्रहार सैनिकांनी केली आहे.
