Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मोबाईल व्हाट्सअप द्वारे चालू आहेत अवैध धंदे

Responsive Ad Here

 जितेश कारिया प्रतिनिधी हिवरखेडा

         पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून मोबाईल वरली मटक्याच्या फंडा

हिवरखेड  येथे खुलेआम दुकाने मांडून सुरू असलेला वरली मटका पोलिसांनी पडद्याआड केला असला तरी या बहद्दरांनी नवीन शक्कल लढवत मोबाईल वरली मटक्याचा फंडा काढला असून हे बहाद्दर जणू हिवरखेड पोलिसांच्या डोळ्यात धूळफेकच करीत आहेत.

काही दिवसापूर्वी हिवरखेड येथे वरली मटक्याच्या दुकानेच थाटली होती यासह अवैध दारू विक्री व इतरही अवैध धंदे खुलेआम सुरू होते. मात्र अचानक पोलिसांनी फरमान काढून येथील वरली मटका बंद केला या फरमाना नंतर वरली मटका बंद तर झाला नाही मात्र हा अवैध धंदा पडद्याआड करण्यात पोलिसांना यश आले.

     वरली मटका बहाद्दरांनी मात्र यात नवीन शक्कल लढवत मोबाईल वरली मटक्याचे आकडे मोबाईल वर घेऊन हा अवैध धंदा सुरूच ठेवला. हिवरखेड सह पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये शंभरच्यावर  बहादर मोबाईल वर वरली मटका व्यवसाय घेत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे .हिवरखेड व परिसरात मात्र अवैध दारू विक्रीचा जणू महापूरच आला आहे हिवरखेड व परिसरात प्रत्येक दिवसाला अंदाजे 50 ते 70 दारूचे बक्से विविध ठिकाणी पोहोचविल्या जात असून त्या त्या ठिकाणी या दारूची अवैधरित्या जास्त रक्कम घेऊन सर्रास विक्री केल्या जाते. 

येथील इंदिरानगर सहा विविध भागात अवैध दारू विक्री केल्या   जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. या अवैध दारू विक्री बाबत काही नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली असता त्यांची तक्रारही घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याची माहिती तक्रारकर्त्यांनी दिली आहे. खुलेआम होत असलेल्या या अवैध दारू विक्रीमुळे येथील शेतमजूरांसह युवक मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. मोबाईल वरली मटका सह अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी लगाम कसावा तसेच येथील शासन मान्य दारू दुकान विक्रेत्यांना सुद्धा ताकीद दयावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.