राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियान द्वारे भाजपा वैद्यकीय आघाडी यांच्या सौजन्याने प्रदेश संयोजक डॉ अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळखोपा ता मंठा जिल्हा जालना येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास ३५० रुग्णांची मोफत तपासणी व औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा विनोद दादा वाघ (भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा), मराठवाडा व विदर्भातील प्रथम महिला प्लास्टिक सर्जन डॉ उज्वला दहीफळे कराड (प्रदेश सन्मयक राष्ट्रीय स्वास्थ अभियान तथा मराठवाडा संयोजक भाजपा भटक्या विमुक्त महीला आघाडी), डॉ स्वप्नील मंत्री (प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश) यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ पंकज भिवटे (विदर्भ संयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी), डॉ आकाश बाजड (वाशीम जिल्हा संयोजक), डॉ ऋतुराज सागळे (बुलढाणा जिल्हा संयोजक), भाजपा तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस धारसिंग चव्हाण, पं.स. सदस्य दत्ताराव कागंने, रामजी कांगणे सामाजिक कार्यकर्ते सरपंच पंढरीनाथ कांगने, मा सरपंच प्रदीप चाटे, सुभाष कांगणे इत्यादि उपस्थित होते. महाआरोग्य शिबिराचे आयोजन डॉ ज्ञानेश्वर कांगने यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कांगने यांनी केले. विनोद दादा यांनी आपल्या भाषणामध्ये 60 वर्ष पासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मी मार्गी लावेल ही ग्वाही दिली. अध्यक्षीय भाषणं मध्ये डॉ उज्वलाताई दहिफळे यांनी निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन केले त्यासोबतच गरीब गरजूंना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोस्त्याहीत केले.
डॉ स्वप्नील मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी सुरू केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन भाजपा वैद्यकीय आघाडी सेवा व समर्पण अभियानची माहिती दिली. त्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाट येण्यापूर्वी काय काय काळजी घ्यावी ही माहिती दिली. डाँ पंकज भिवटे यांनी प्रदेश संयोजक डॉ अजितजी गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सेवा कार्याची व आरोग्य शिबीराची माहिती दिली. आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश्वर कांगणे यांनी केले व सर्व प्रमुख उपस्थितीतांचे आभार मानले.
