दत्तात्रय शेळके प्रतिनिधी जालना
गेल्या 8 दिवसांपासून मराठवाड्यात ऐन सोयाबीन काढणी हंगामात सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी उभे असलेले सोयाबीन उगवून निघत आहे.तर काही ठिकाणी काढलेल्या सोयाबीनची पसर जमिनीवर असल्याने सोयाबीनला बुरा लागून सोयाबीन नासत आहे.सोयाबीनसोबतच या जास्तीच्या पावसाने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे या नुकसानभरपाईपोटी शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 100000(एक लाख रूपये) रुपयांची मदत करावी.
जाहिर करावी ही आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हात जोडुन विनंती. नसता मनसे येणाऱ्या टाईमाला शेतकऱ्यांसहीत तहसील कार्यालय समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल याची सर्व सवी जबाबदारी प्रशासनाची राहील. या वेळी उपस्थित कृष्णा खलसे जालना तालुका अध्यक्ष, श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे तालुका उपाध्यक्ष, ओमकार गवळी, महादेव चोरमारे, योगेश किगरे, धोंडीराम पंडीत, रामराव कोल्हे, परसराम देशमुख, अदी उपस्थित होते.
