देऊळगाव प्रतिनिधी भीमराव चाटे
देशाच्या विकासात योगदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आण्णा काळे* सैनिक म्हटलं की तसं सर्वांनाच हृदय भरून येते कारण त्या पाठीमागे असतं त्यांचं अहोरात्र लोक सेवेसाठी जगणं बलिदान स्वतःच्या सुखाची पर्वा न करता घरापासून दूर घर, नव्हे नव्हे हे विश्वचि माझे घर .जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी वेगळी कारण तिथे नसतो कोणताही स्वार्थ नाही आपले आणि परके पण. सर्व धर्म समभाव जोपासणारे,
कारण सैनिकाची कोणतीही जात नसते त्याच्या डोळ्यापुढे असते सर्वप्रथम देश. बंदूक घेऊन देशाच्या सीमेवर जाऊन लढाई करणं म्हणजेच सैनिक नाही तर वेळ मिळेल तिथे मानवजातीची सेवा करणारे ,प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, कुठे मुला-मुलींना यश प्राप्त झाले असेल तर त्यांना व त्यांच्या पालकांचे स्वागत करणारे त्यांचा हौसला वाढवणारे ,प्रत्येक माता-भगिनी कडून राखी बांधून घेणारे ,आता नाही दहा पंधरा दिवसांनी तुझ्याकडे एक वेळ जेवायला येईल तेव्हा प्रत्येकाला विचारांची देवाण-घेवाण करून सन्मार्ग दाखवणारे स्वातंत्र्यसैनिक म्हणजे अण्णा काळे.
रा. स्व. संघाचे पूर्णवेळ आयुष्यभर प्रचारक, राष्ट्रसेवा- जनसेवा हे एकच ध्येय, आजन्म, केवळ सेवेकार्यासाठी ब्रम्हचर्य व्रताचे पालन करून, हिंदुधर्म व भारत हे राष्ट्र विश्वगुरु करण्याची प्रेरणा विविध वैचारिक संदेशमधून प्रेरणा देत होते. यासाठी अनेक वेळा जेल, लाठीमार, उपोषणे, धरणे तन-मन धनाने उतरले. गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम आंदोलनात इतका सहभाग की पोर्तुगीजांच्या लाठीमाराने शरीराच्या जवळ जवळ सर्व हाडे मोडली "मन के हारे हार है मन के जीते जीत" मनोबलाने उपचारानंतर पुन्हा राष्ट्रनिर्मीती कार्यास उभे झाले, देउळगाव राजाच्या पाणी प्रश्नासाठी आमरण उपोषण केले. महाराष्ट्राचे रस्ते, रेल्वे विद्यापिठ, खनिज संपत्ती, झाडे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, महिलांचे सर्व प्रश्न, लोणार सरोवराचे उत्थानासाठी राष्ट्रपती पर्यंत संपर्क, प्रत्येक सामान्यांच्या समस्येसाठी त्या कठीण परिस्थितीत आण्णा सतत लढत राहीले. जनसंघ,जनता पक्ष, भा.ज.पा.च्या माध्यमातुन विरोधक म्हणुन ठामपणे, उघडपणे, सडेतोड पणे सतत कार्यरत राहुन आयुष्यभर जनसेवा केली. आजही देऊळगाव राजा बालाजी नगरीत त्यांच्या वयातील बुजुर्ग गोंदकर काका काकू कुलकर्णी साहेब डॉक्टर देशपांडे साहेब अनेक देऊळगावकर त्यांचे कार्य अनमोल होते व सोबत राहण्याचे अनुभव सांगतात
साखरखेर्ड्याचे मुळ रहिवासी आण्णा प.पु. प्रल्हाद महाराजांचे पुतणे होत. आण्णांनी आपली कर्मभूमी म्हणून दे-राजाला बरेच वर्षे सेवा देवून उपकृत केले. त्यांचे नांव देऊळगाव येथील नगर पालीका वाचनालयाला देण्याचा नगर पालीकेने ठराव संमत केला. त्यांच्या कर्मभूमीने त्यांच्या वैचारीक व संघर्षमय आठवणींचा वारसा जतन करण्यासाठी निश्चीत न्याय दिला आहे. या निमीत्ताने नगरवासीयांची अनेक वर्षांची मागणी या निमित्ताने पूर्ण होत आहे. देऊळगाव राजा नगर परिषद चे मुख्य अधिकारी नगर परिषदेच्या अध्यक्ष महोदया सुनिता ताई शिंदे उपाध्यक्ष पवन जी झोरे व नगर परिषद चे सर्व माननीय सदस्य यांनी सैनिकांसाठी बुलढाणा जिल्ह्यात सर्व तालुक्यांपैकी प्रथम स्थानावर सर्व आजी माजी सैनिकांना प्यारा मिल्ट्री सैनिकांना एक पाऊल पुढे येऊन सुविधा देतात आज पुन्हा एकदा नगरपालिकेने स्वातंत्र्यसैनिक अण्णा काळे यांच्या नावाचा वाचनालयाला नाव देऊन गौरव केला आहे त्याबद्दल सर्व मिळून सैनिक मित्रांकडून मनोमन आभार मानले जात आहे. जय हिंद!!

