जालना प्रतिनिधि राजकुमार कांगणे
राज्यशासनाने शेतकर्यांना हेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत करावी-भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर शेजुळ
सेवली सर्कलसह जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिण्यापासुन पावसाने हाहाकार माजवला असुन, जिल्ह्यात अनेकवेळा ढगफुटीचे प्रकार घडले आहेत, सेवली सर्कलमध्ये सातत्याने अतिवृष्टी होत असुन शेतकर्यांच्या शेतातील मुग,उडीद,तुर,सोयाबीन, कापुसासह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झले आहे शेतकरी वर्ग मेटाखुटीला आला असल्याने राज्यशासनाने सरसगट ओला दुष्काळ जाहिक करुन शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची तात्काळ मदत द्यावी अशी भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, राज्याचै कृषिमंत्री ना.दादाजी भुसे व राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे.
जालना तालुक्यातील बीबी गावातील शेतकरी श्री काळेबाग यांच्या सोयाबीनच्या पिकाची पाहणी करण्यासाठी ज्ञानेश्वर शेजुळ यांनी भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांसोबत नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधला.यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ यांनी शेतकरी व माध्यमांशी संवाद साधला असता बोलताना ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले की सध्या शेतकरी वर्ग जगाचा पोशिंदा आर्थिक संकटात सापडला असल्याने राज्यसरकारने पंचनामे करण्यात वेळ वाया न घालता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तात्काळ जाहीर करुन शेतकर्यांच्या खात्यावर टाकावी. व पिकविमा कंपन्यांना सक्त आदेश देऊन पिकविमासुद्धा देण्यात यावा.अशी आग्रहाची राज्यशासनाकडे मागणी केली आहे.
यावेळी भाजपा महिलाआघाडीच्या जालना जिल्हाध्यक्षा,श्रीमती जिजाबाई जाधव,जालना पंचायत समितीचे सदस्य दिलीपराव पवार, सेवलीचे मा.सरपंच मदनराव काळे, सावरगाव भागडे_बीबीचे सरपंच अच्युतराव अंभुरे, मा.सरपंच डिगांबर काकडे, मा.चेअरमन गोविंदराव काकडे, पाष्ट्याचे भाजपा पदाधिकारी प्रभाकर गाढवे, सेवली ग्रां.पं.मा.सदस्य शिवराज तळेकर, बबनराव भागडे,शेतकरी काळेबाग यांच्यासह गावकर्यांची उपस्थिती होती.

