Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हा बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनल ची दमदार विजय

Responsive Ad Here

जयकुमार बुटे/अमरावती प्रतिनिधी


अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलजी बाजी, बच्चू कडूंचा परिवर्तन पॅनल पराभूत


अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलजी दणदणीत विजय तसेच, बच्चू कडूंचा परिवर्तन पॅनल चा सिंह आला पण गड गेला अशी व्यवस्था परिवर्तन पॅनल ची  झाली आहे तसेच सहकार परिवर्तन पॅनल च्या फाइट मध्ये परिवर्तन पॅनल पराभूत अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलजी बाजी, बच्चू कडूंचा पॅनल पराभूत Amravati district bank election result: जिल्हा बँक निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलची बाजी 21 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय.


  अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झालेला आहे. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख  यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासोबतच बँकेवर आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. तसेच बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं देखील परिवर्तन पॅनल ने सातत्याने  आरोप व प्रचार केला होता.

  सहकार पॅनलला निवडणुकीत 13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजुन स्थापन व्ह्ययची आहे. राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ असे देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सागिलते आहे.

   या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख आणि उत्तरा जगताप यांच्या वर ED ने नोटीस बजावल्या आहेत. मात्र विरोधकांचे सर्व आरोप नाकारत मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे. बँकेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही तसेच पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आमचे पॅनल शेतकऱ्या साठी काम करणार आहे असे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

   या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकुर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बँकेत चांगल्या पद्धतीने काम केले, विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बँकेने शेतकऱ्यांसाठी काम केले येत्या काळात महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करू अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. आणि सगळ्यांचे मनस्वी आभार मानले.