भिमराव चाटे प्रतिनिधी दे राजा
भारतीय सैन्य दल भरती संदर्भात काल पुणे येथे झालेल्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे . त्या चर्चेत भारतीय सेनेकडून सांगण्यात आले आहे की , कोल्हापूर ARO ची अर्ज भरण्याची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल भरतीप्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू करण्यात येईल . नंतर पुढील ARO च्या भरतीप्रक्रिया राबविण्यात येतील . कारण एका ARO ची भरती प्रक्रिया राबविणेसाठी तीन ARO चे युनिट कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार किंवा वशिलेबाजी होऊ नये म्हणून एका भरती प्रक्रियेत बोलावले जातात . त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात भरतीप्रक्रिया राबवणे भारतीय सेनेला शक्य होणार नाही . परंतु सन २०२२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे . तसेच आपण केलेल्या मागणीनुसार समस्त भारतातील भारतीय सैन्य दल भरती इच्छुक उमेदवारांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत . उदा. वय २१ साठी २३ आणि वय २३ साठी २५ करण्यात येणार आहे . आणि हेच वयोमर्यादेचे नियम कायमस्वरूपी ठेवण्याबाबत विचार केला जाणार आहे . पूर्वी भरतीकरिता फक्त अर्ज भरलेल्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागतील . सैनिक मित्र फाउंडेशन कृत महाराष्ट्र सैनिक करियर अकॅडमी देऊळगाव राजा विद्यार्थ्यांना ना लाभ ना तोटा या तत्त्वावर राहण्याचे खाण्याचे क्लास चे पैसे भरा आणि मोफत ट्रेनिंग करा अशाप्रकारे शिस्तीने ट्रेनिंग देत आहे व दोन वर्षाची झालेली वाढ ही विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आहे एनसीसी सी सर्टिफिकेट असलेले सैन्य प्रेमी मुले यांचे वाढत्या वयामुळे मन खचून गेले होते ते आता जोमाने प्रॅक्टिसला लागलेले आहेत आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा घरी जायचे नाही असे म्हणतात तरी आम्ही सर्व सैन्य दल भरती इच्छुक उमेदवारांना विनंती करीत आहोत की , आपण आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करा . भरतीबाबत कोणत्याही बाबींचा विचार करू नका . मोबाईल ला दोन-तीन महिने जरा दूर ठेवावा मोबाईल तुमचा अभ्यास न होऊ देता रात्री दोन दोन वाजेपर्यंत ऑनलाइन राहतो सकाळी ग्राउंड वर येण्यास उशीर होतो त्यासाठी मोबाईल टाळावा. काही प्राप्त करायचे असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल कृपया याची नोंद घ्यावी .
मुलां मुलींनी एजंट व कोणाच्याही भुल थापा ला बळी पडू नये. आपली मेहनत व अभ्यास हेच आपल्याला यशस्वी करू शकते.जे मुले तयारी करीत आहेत त्यांनी पोलिस, आर्मी, वनरक्षक, लिपिक, ग्रामसेवक, लायसेन्स काढून ड्रायव्हर पद, तलाठी, ग्रामसेवक असे सर्व ऑप्शन ठेवावे. यश मिळेलच परंतु, नुसतेच सकाळ संध्याकाळ धवण्यापेक्षा कोणत्या मार्गाने मी यशस्वी होईल हा विचार करून निर्णय घ्या.
यश मिळण्यासाठी धोरणामुळे जी आपणाला संधी मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या व रात्रंदिवस स्वतःचे शरीर सांभाळून सराव करा देऊळगाव राजा हे शिक्षणाचे माहेर घर आहे येथे प्रत्येक विषयांचे शिक्षकांचे क्लास चालतात अनेक अभ्यासिका आहेत अनेक सैनिक करियर एकेडमी आहेत चांगले चांगले कवायत मैदान आहे सण उत्सव सुट्ट्या साजरा करण्यापेक्षा अभ्यासावर भर दिला आणि सरकारने वाढलेल्या दोन वर्षाचा फायदा घेतला तर जीत तुमचीच असेल जय हिंद