Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सहकार विद्या मंदिर येथे बोधिवृक्ष सह विविध वृक्षाचे वृक्षारोपण

Responsive Ad Here

भीमराव  चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी बुलढाणा अर्बन परिवाराचे चिफ मॅनेजिंग *सहकार विद्या मंदिर प्रांगणात बोधिवृक्षा सह इतर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. डायरेक्टर डॉक्टर सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातृऊतिर्थ सिंदखेड राजा येथील. 

        सर्वप्रथम बुलढाणा अर्बनचे मेहकर विभागाचे व्यवस्थापक श्री.ज्ञानेश्वर देशमाने यांनी डॉक्टर सुकेशजी झंवर साहेबांना तथा उपस्थितांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करून वृक्षारोपना पाठी मागची पार्श्वभूमी व बुलढाणा अर्बन परिवाराच्या  पर्यावरण पूरक स्तुत्य उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

वृक्षारोपण  श्री.सतीश तायडे,श्री.विजय तायडे,श्री. ज्ञानेश्वर देशमाने,वनश्री.जनाबापू मेहेत्रे सह मान्यवर...


       वृक्षारोपण कार्यक्रमास निमंत्रित मातृतिर्थ सिंदखेड राजा चे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. सतीशभाऊ तायडे,उपनगराध्यक्ष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री.विजयभाऊ तायडे, नगरसेवक प्रतिनिधी श्री.गौतम खरात,बुलढाणा अर्बन परिवाराचे मेककर विभाग व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर देशमाने,वनसंरक्षण समिती सिंदखेड राजा चे तालुका अध्यक्ष श्री.संजयभाऊ उगले, धरती बचाओ परिवाराचे सीएमडी वनश्री.जनाबापू मेहेत्रे,सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा चे मुख्याध्यापक श्री.आर.डी.शेरे,  बुलढाणा अर्बन शाखा सिंदखेडराजा व देऊळगाव राजा चे व्यवस्थापक श्री.उदय कुलकर्णी,श्री.संजय कुलकर्णी, पत्रकार गजानन मेहेत्रे,पर्यावरण प्रेमी श्री.सुधाकर चौधरी,श्री. राजेश्वर खरात,ऍड.सुरेखा गोरे आदींच्या हस्ते वृक्ष पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. 

      कार्यक्रमात वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा तथा परिसर पर्यावरण संतुलित समृद्ध करण्यासाठी नगरपालिका, बुलढाणा अर्बन परिवार, सेवाभावी संस्था,पर्यावरण प्रेमी शाळा,महाविद्यालये,शासकीय कार्यालये यांना पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी धरती बचाओ परिवार,बुलढाणा अर्बन शाखा सिंदखेड राजा देऊळगाव राजा,सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा च्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वनश्री.जनाबापू मेहेत्रे मातृतिर्थ सिंदखेडराजा जि.बुलढाणा