बुलढाणा प्रतिनिधी संदीप म्हस्के
अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत दहा ते बारा वर्षांपासून शिक्षकाच्या विविध समस्या प्रलंबित आहेत,प्रहार शिक्षक संघटनेमार्फत वारंवार निवेदने देऊन सुद्धा दहा ते बारा वर्षांपासून शिक्षकांना पदोन्नती मिळालेली नाही अश्या अनेक मागण्या सोडविण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले असुन सदर आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस देवीदास बडगे,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश नरोटे,जिल्हा संघटक गजानन दराडे,मुरलीधर टाकरस,जिल्हा उपाध्यक्ष धनराज धंदर,अविनाश घुगे,जिल्हा सहसचिव संदिप नागरे,जिल्हा सहसंघटक शकिल पीर मोहम्मद,संदिप कदम,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी,जिल्हा प्रतिनिधी अन्सार शहा,शेख बिसिल्ला शेख नुरा,शेगांव तालुकाध्यक्ष सुनिल घावट, नांदुरा तालुका अध्यक्ष सतिष लोंढे,संग्रामपुर तालुकाध्यक्ष संतोषराव घिवे,खामगांव तालुकाध्यक्ष शांताराम पांढरे,लोणार तालुकाध्यक्ष दिलीपजी अघाव,कडुबा जाधव,देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष विजय मांटे,सिंदखेड राजा तालुकाध्यक्ष शरद जायभाय आदी पदाधिका-यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेशजी ठाकरे यांच्याशी बुलढाणा जिल्ह्य़ातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आलेली असुन शिक्षकांच्या समस्या निकाली न निघाल्यास लवकरच बुलडाणा जिल्हा परिषद समोर अश्याच प्रकारचे बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असे याप्रसंगी ठरविण्यात आले.
प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेशजी ठाकरे यांचा याप्रसंगी पुष्पगुच्छ व गजानन महाराजांची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला,गत तीन महिन्यांपासून प्रहार शिक्षक संघटनेने केलेल्या कार्याचा कार्यपुर्ती अहवाल सादर करून बुलडाणा जिल्हयातील शिक्षकाच्या ज्वलंत समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,यामध्ये प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगामध्ये सन २००४ नंतर सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांच्या वेतन निश्चिती बाबतीत निर्माण झालेल्या त्रुटीचे निराकरण करणे,शिक्षकांची मुख्यालयी राहण्या संदर्भातील अट शिथील करणेबाबत ,शिक्षणसेवक मानधनात वाढ करणेबाबत,डिसीपीएस धारक शिक्षकांच्या कार्यरत असलेल्या पुर्वीच्या जिल्हयातील कपात झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने वर्ग करणेबाबत,भविष्य निर्वाह निधी तसेच डिसीपीएस या दोनही खाते असलेल्या शिक्षक बांधवांच्या खात्यांचा घोळ निकाली काढणेबाबत,वेतनाची सीएमपी वेतन प्रणाली लवकरात लवकर लागू होणेबाबत व आदी इतर महत्त्वपूर्ण स्थानिक समस्या निकाली काढण्याची चर्चेद्वारे मागणी करण्यात आली.
प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांच्या समस्या सोडविणे व सामाजिक कार्य करण्याची गती पाहता राज्यध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांचे विशेष कौतुक केले, अल्प कालावधीत जिल्हयात प्रहारचे विचार वेगवान पद्धतीने पोहचवाणारे डँशींग जिल्हाध्यक्ष म्हणून गौरव करण्यात आला. राज्यस्तरावरुन लवकरात लवकर बुलडाणा जिल्हयातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी राज्याध्यक्ष महेशजी ठाकरे यांनी याप्रसंगी बुलडाणा जिल्हा पदाधिकारी यांना दिले.